vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

सोन्याच्या किमतीत सतत वाढ ,आज गाठला उच्चांक दर; वाचा 24 कॅरेटचा भाव

 सोन्याच्या किमतीत सतत वाढ ,आज गाठला उच्चांक दर; वाचा 24 कॅरेटचा भाव

 

व्यावसायिक प्रतिनिधी-सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सोनं दिवसेंदिवस उच्चांकी दर गाठत आहे. आज पुन्हा एकदा सोनं महागलं आहे. तर, चांदीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. चांदी MCX वर 356 रुपयांची वाढ झाली असून प्रतिकिलो 95130 रुपयांवर ट्रेड करतेय. आंतरराष्ट्रीय बाजातात कॉमेक्सवरदेखील सोनं $ 3,300 वर पोहोचलं आहे. तर अमेरिकन मार्केटमध्ये स्पॉट गोल्ड $3,281 वर ट्रेड करत आहे. मागील एका आठवड्यात सोन्याची किंमत 6 टक्क्यांनी वधारली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढणारी अनिश्चितता आणि सुरक्षित गुंतवणुक म्हणून सोन्याकडे वाढणारा कल यामुळं सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. अमेरिकेत डॉनल्ड ट्रप यांनी घेतलेल्या निर्णयामुळं गुंतवणुकदारांना सतर्क केले आहे. ट्रेड वॉर, राजकीय तणाव आणि जागतिक मंदी यासगळ्या कारणामुळंही बाजारपेठेत अस्थिरता आहे.

आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 950 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 88,150 रुपयांवर पोहोचलं आहे. तर एक ग्रॅम सोन्याचे दर 8,815 रुपयांवर स्थिरावले आहेत. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 990 रुपयांनी वधारले असून 96,170 रुपये प्रतितोळा सोन्याची आजची किंमत आहे. 18 कॅरेट सोन्याचे दर 780 रुपयांनी महागले असून 72, 130 रुपये प्रतितोळावर स्थिरावले आहे.

काय आहेत सोन्याचे दर

ग्रॅम              सोनं           किंमत-

10 ग्रॅम     22 कॅरेट  88,150 रुपये

10 ग्रॅम     24 कॅरेट 96,170 रुपये

10 ग्रॅम    18 कॅरेट  72,130 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

1 ग्रॅम     22 कॅरेट   8,815 रुपये

1 ग्रॅम     24 कॅरेट   9,617 रुपये

1 ग्रॅम    18 कॅरेट   7,213रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

8 ग्रॅम     22 कॅरेट   70,520 रुपये

8 ग्रॅम     24 कॅरेट   76,936रुपये

8 ग्रॅम    18 कॅरेट    57,704 रुपयेमुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?22 कॅरेट-88,150 रुपये24 कॅरेट- 96,170 रुपये18 कॅरेट- 72,130 रुपये

संबंधित पोस्ट

उद्योगांसाठी कर्ज योजनेचे अर्ज तातडीने निकाली काढावेत- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटींचे सामंजस्य करार–परदेशी विद्यापीठात शिक्षणाचे स्वप्न आता एज्यू सिटी’च्या माध्यमातून पूर्ण होईल- मुख्यमंत्री 

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीना 8 मे पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय-बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी उमेद अभियान वचनबध्द- मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर,महालक्ष्मी ट्रेड सरस मध्ये कोट्यावधींची उलाढाल..

vishwatmaklokswamivarta

भारतीय डाक विभागाची सेल्फ बुकींग व डोरस्टेप पिकअप सुविधा; नागरिकांना घरबसल्या जलद आणि आधुनिक सेवा…

vishwatmaklokswamivarta