vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे येथील कोलशेत खाडी येथे अनधिकृत रेती उत्खनन करणारे 1 बार्जेस व 2 सक्शन पंप नष्ट

ठाणे येथील कोलशेत खाडी येथे अनधिकृत रेती उत्खनन करणारे 1 बार्जेस व 2 सक्शन पंप नष्ट….

 

ठाणे, प्रतिनिधी:- मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल क्रिमिनल रीट पेटीशन नं.2911/2022 च्या अनुषंगाने ठाणे उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या आदेशाने कल्याण निवासी नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण यांच्यासोबत नडगाव मंडळ अधिकारी दर्शना भावे व ग्राम महसूल अधिकारी आरती कारंडे, गणेश पादीर, देवानंद लोखंडे, लक्ष्मण शिंदे व महसूल सेवक साईनाथ सोनवणे हे दि.15 एप्रिल 2025 रोजी खाडीपात्रात गस्त घालत होते.

गस्त घालत असताना कोलशेत खाडी येथे होणाऱ्या अनधिकृत रेती उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी बोटीद्वारे गस्त घातली असता खाडीपात्रामध्ये अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या 1 बार्जेस व 2 सक्शन पंप आढळून आले. हे सर्व साहित्य गॅस कटरने नष्ट करण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते ‘जन सेहत सेतू’ शिबीराचे व पोर्टलचे लोकार्पण‘निरोगी, समृद्ध व विकसित भारत’ संकल्पनेसाठी आरोग्य क्षेत्राची मोठी जबाबदारी -डॉ. मनसुख

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता परदेश शिष्यवृत्ती; 1 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !तरुण पिढीला उद्ध्वस्त करणाऱ्या ‘सनबर्न’ संस्कृतीला लगाम लावून तातडीने ‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’ अभियान राबवा!

इतर मागास बहुजन कल्याण विभागात महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणी कामाचा,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आढावा…

पुण्याच्या उच्चभ्रू खराडी परिसरात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा धाडसी छापा सात अटक — कोकेन, गांजा, हुक्का, दारू आणि इतर अंमली पदार्थ जप्त.

vishwatmaklokswamivarta