vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मंत्रालयात ५ ते ९ मे दरम्यान “टेक वारी – महाराष्ट्र टेक लर्निंग वीक”विशेष प्रशिक्षण कार्यक्रम- अपर मुख्य सचिव व्ही राधा

मंत्रालयात ५ ते ९ मे दरम्यान “टेक वारी – महाराष्ट्र टेक लर्निंग वीक”विशेष प्रशिक्षण कार्यक्रम- अपर मुख्य सचिव व्ही राधा

 

मुंबई, प्रतिनिधी : नागरी सेवा दिनाचे २१ एप्रिल औचित्य साधून महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करणे तसेच मुख्यमंत्री महोदयांना 100 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या iGOT प्रणालीवर तीन महिन्यात 9 हजारावरून 5 लाख कर्मचा-यांची नोंदणी करण्यात आलेल्या सर्वांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे. यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे “महाराष्ट्र टेक लर्निंग वीक – टेक वारी” हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम दि. ५ मे ते ९ मे २०२५ दरम्यान मंत्रालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आला असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी सांगितले.

श्रीमती राधा यासंदर्भात म्हणाल्या, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), सायबर सुरक्षा अशा तंत्रज्ञान विषयांवर तज्ज्ञांचे सत्र, कार्यशाळा व विचारमंथनाच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश फक्त तंत्रज्ञानाचे ज्ञान देणे नसून, मानसिक व शारीरिक आरोग्य संवर्धन, तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे हाही आहे.

उद्घाटन कार्यक्रम सोमवार, दि. ५ मे रोजी सकाळी त्रिमूर्ती प्रांगणात होणार असून, विशेष सत्र मंगळवार, दि. ६ मे रोजी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या सत्रात केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव “डिजिटल परिवर्तन व प्रशासनातील नवप्रवर्तन” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

मंत्रालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच जिल्हास्तरावरील प्रतिनिधींसाठी प्रत्येक दिवशी तंत्रज्ञान सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, दररोज एक प्रमुख सन्माननीय व्यक्ती तंत्रज्ञानविषयक व्याख्यान देणार आहेत.हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल युगात पुढे जाण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

000००००

संबंधित पोस्ट

अमली पदार्थ तस्करांवर कायद्याचा धाक यापुढेही कायम ठेवा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- 

सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. मैनाक घोष रुजू-मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची पदोन्नतीने बदली

vishwatmaklokswamivarta

स्वीप उपक्रमात नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी हस्तकला, रांगोळी प्रदर्शनातून दिला मतदानाचा संदेश…

कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने जीवितहानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मृतांना श्रद्धांजली तर नातेवाईकांना रु. ५ लाख अर्थसहाय्याची घोषणा

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ आणि पैठण, आपेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्या बाबत आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.25 जानेवारी 2025 रोजी15 व्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta