vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

जातिनिहाय जनगणना हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचा क्रांतिकारक निर्णय ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*जातिनिहाय जनगणना हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचा क्रांतिकारक निर्णय ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

 

मुंबई प्रतिनिधी ~ जातनिहाय जनगणना करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा क्रांतिकारक निर्णय आहे. जातनिहाय जनगणने च्या निर्णयाचे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही स्वागत करतो. काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात हा निर्णय घेण्याची हिंमत दाखवली नाही आता राहुल गांधींनी यावर टीका करू नये. सर्व जातींना न्याय देण्यासाठी ही जातनिहाय जनगणना उपयोगी ठरेल. या क्रांतिकारक निर्णय बद्दल आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करीत आहोत अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी जातनिहाय जनगणने च्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

भारतीय संविधानाच्या कलम 17 नुसार जातीभेद करणाऱ्या जाती संपवण्यात आल्या आहेत.मात्र तरीही समाजात जाती आहेत.प्रत्येक जातीची लोकसंख्या या जातिनिहाय जनगणने नुसार स्पष्ट होईल.कोणत्या जात घटकाला कोणत्या क्षेत्रात मागास आहेत.त्यांना कसली कमतरता आहे.त्याची पूर्तता करण्यास या जात

जनगणनेचा फायदा होईल.प्रत्येकाला न्याय देण्यासाठी देशात समाजात प्रत्येक जातीची सद्यस्थिती सत्य चित्र स्पष्ट होणे आवश्यक आहे.त्यासाठी ही जात जनगणना उपयोगी ठरेल.सामाजिक समता आणि सर्वांचा सर्वंकष विकास करण्यासाठी जात जनगणना महत्वाची ठरेल. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जातनिहाय जनगणनाचा निर्णय हा त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.असे सांगत ना. रामदास आठवले यांनी जातनिहाय जनगणना च्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

ग्रामीण रस्त्यांची कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करा – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे जामखेड तालुक्यातील दौंडाचीवाडी-तरडवाडी व वंजारवाडी-तित्रंज रस्त्यांचे भूमिपूजन

मूग-उडीद पीकस्पर्धेसाठी अर्जाची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढ; खरीप पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

अहिल्यानगर जिल्ह्यात सुट्या पेट्रोल – डिझेल विक्रीवर बंदी  जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम संपन्न

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या सदस्य निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर*