vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जातनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी ठरेल – मंत्री अतुल सावे

जातनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी ठरेल – मंत्री अतुल सावे

 

राज्य प्रतिनिधी-मुंबई, केंद्र सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा ओबीसी व वंचित घटकांच्या दृष्टीने क्रांतिकारी ठरेल, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे आभार मानले आहे.

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांच्यासाठी धोरण व योजना आखण्यात मदत होणार असून, स्वतंत्र निधी नियोजन करण्यासही आधार मिळणार आहे. अनुसूचित जाती व जमातीप्रमाणे आता इतर मागास प्रवर्गालाही शिक्षण, रोजगार, आरोग्य, निवारा अशा मूलभूत सुविधांचा लाभ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री सावे म्हणाले की, या घटकांना खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रवाहात सामील होता येणार आहे. या निर्णयाबद्दल मंत्री सावे यांनी केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानले आहेत.

संबंधित पोस्ट

फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांना महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतिहारी येथे ७,२००कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनकेले

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना-मुदतवाढीची ती बातमी खोटी

सांगली येथे विद्यार्थी विभागाचे ६५ वे राज्य कला प्रदर्शन – मंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

पाण्याचा काटकसरीने वापर करणे काळाची गरज – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले’जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५’चा समारोप

गणेशपूर होणार ‘कवितेचे गाव’; लाखनी ‘पुस्तकांचे गाव’ जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषेसाठी स्वतंत्र कक्ष; मान्यवर साहित्यिकांशी मंत्री डॉ. उदय सामंत यांचा संवाद