vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

रोजगार हमी योजना समितीच्या सदस्‍यपदी आमदार सुधाकर अडबाले यांची नियुक्‍तीसभापतींनी केली तीन समित्‍यांवर नियुक्‍ती..

रोजगार हमी योजना समितीच्या सदस्‍यपदी आमदार सुधाकर अडबाले यांची नियुक्‍तीसभापतींनी केली तीन समित्‍यांवर नियुक्‍ती..

गडचिरोली : प्रतिनिधी-

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांची रोजगार हमी योजना समितीसह अन्‍य दोन समित्‍यांवर सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदार सुधाकर अडबाले यांचे विधान परिषदेतील कार्य पाहता त्‍यांची ‘रोजगार हमी योजना समिती, इतर मागासवर्ग कल्‍याण समिती व कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे’ या तीन समित्‍यांवर सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधान परिषद सदस्‍यांमधून सदस्यपदी नियुक्ती केली आहे.

आमदार अडबाले यांनी या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त केले असून, विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, मजूर आणि ग्रामीण जनतेच्या हितासाठी ही संधी उपयोगात आणणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

आमदार सुधाकर अडबाले यांच्या नियुक्‍तीबद्दल म. रा. मा. शि. महामंडळाचे सरचिटणीस माजी आमदार व्‍ही. यू. डायगव्‍हाणे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख, उपाध्यक्ष रमेश काकडे, जयप्रकाश थोटे, जयकुमार सोनखासकर, विजय ठोकळ, विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, बाळासाहेब गोटे, कोषाध्यक्ष भूषण तल्‍हार, जिल्‍हा, महानगर, तालुका पदाधिकारी, सदस्‍यांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित पोस्ट

केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रो प्रकल्पाच्या पाचव्या टप्प्याचा (ए) भाग असलेल्या तीन नव्या मार्गिकांच्या उभारणीला मंजुरी दिली

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरावरील स्थानिक तक्रार समितीची पुर्नगठीत करण्यासाठीइच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

प्राप्तिकर विभाग, नागपूरतर्फे प्राप्तिकर कायदा, 2025 संदर्भात “प्रारंभ–2026” जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन तंत्रज्ञानावर आधारित करदाता सेवा आणि सुलभ कर कायदे ऐच्छिक अनुपालन बळकट करतील”-डॉ.सिबिचेन के.मॅथ्यू,महासंचालक,एनएडीटी

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त सरदार 150 एकता अभियान· विविध उपक्रमाचे आयोजन· ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर

विधानसभेत दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली; दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थानाचा विधानसभाध्यक्षांचा प्रस्ताव