vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

लघुपट हे सामजिक भावना, विचार मांडण्याचे प्रभावी माध्यम- दिग्दर्शक व्याचेस्लाव गुज ,कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ चर्चासत्र

लघुपट हे सामजिक भावना, विचार मांडण्याचे प्रभावी माध्यम- दिग्दर्शक व्याचेस्लाव गुज ,कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ चर्चासत्र..

 

सांस्कृतिक प्रतिनिधी-मुंबई लघुपट हे मनोरंजनाचे माध्यम नाही तर सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनातील भावना आणि विचार प्रभावी मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे,असे मत प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक व्याचेस्लाव गुज यांनी व्यक्त केले.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत ‘कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ या चर्चासत्रात ते बोलत होते.

दिग्दर्शक गुज़ म्हणाले की, सामजिक जीवनात आपल्याला येणाऱ्या वेगवेगळ्या अनुभवातून प्रत्येकाच्या मनात एक लघुपट (शॉर्ट फिल्म) तयार असतो, फक्त त्याला मूर्त स्वरूप देण्याची गरज असते. डिजिटल माध्यमामुळे आता ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.आजच्या तरुण कलावंतांमध्ये लघुपट निर्मितीकडे अधिक कल वाढला आहे. लघुपटाचे यश विषयापेक्षा त्यामागील भावना आणि आशय प्रेक्षकांपर्यंत नेमकेपणाने पोहोचविण्यात असते असे त्यांनी सांगितले. यावेळी विविध विषयांवर लघुपट दाखविण्यात आले.

00000

संबंधित पोस्ट

अमेरिकेतील स्थलांतराच्या वादावर भाष्य करणाऱ्या ‘Undocumented.PDF’ लघुपटाच्या वर्ल्ड प्रीमिअर विषयी कुतूहल! स्थलांतर, मानवी भावना आणि वास्तवाला भिडणारा नाफा फिल्म्सचा नवा लघुपट!

vishwatmaklokswamivarta

मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते विवेक लागू यांचे 19 जून रोजी संध्याकाळच्या सुमारास निधन झाले. सायंकाळी 6.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

देवा’ चित्रपटातील ‘भासद माचा’ हे धमाकेदार गाणे रिलीज, ३१ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित..

vishwatmaklokswamivarta

७२ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कार्तिक आर्यन आणि मामुट्टी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, आर्टिकल ३७० सर्वोत्कृष्ट चित्रपट

भारतीय टपाल विभागाच्यावतीने ‘शोले’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष सन्मान

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी दिली पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) आणि राष्ट्रीय  (एन एफ ए आय–एन एफ डी सी) ला भेट

vishwatmaklokswamivarta