vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक -भारताच्या विजयासाठी गोव्यातील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ‘शतचंडी यज्ञ’! – सनातन संस्था

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक -भारताच्या विजयासाठी गोव्यातील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ‘शतचंडी यज्ञ’! – सनातन संस्था

राज्य प्रतिनिधी- सध्या चालू असलेल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताचा विजय व्हावा म्हणून सनातन संस्थेच्या वतीने होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त २० ते २२ मे २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत २५ पुरोहितांद्वारे शतचंडी यज्ञ करण्यात येणार आहे. हा यज्ञ सर्व नागरिकांसाठी खुला असून यात देशविदेशातील नागरीक सहभागी होणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी दिली.

    फर्मागुडी, फोंडा, गोवा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी हा १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत महोत्सव होणार आहे. या महोत्सवात २३ देशांतील प्रतिष्ठित मान्यवर, विविध संप्रदायांचे संत-महंत, विविध राज्यांचे मंत्री, मंदिरांचे विश्वस्त आणि २५ हजारांहून अधिक साधक, हिंदु धर्मप्रेमी सहभागी होणार आहेत. या यज्ञात सहभागी होणारे लोक भारताच्या विजयासाठी प्रार्थना करणार आहेत. देवभूमी, तपोभूमी, अवतारभूमी आणि पृथ्वीवरील एकमेव सनातन राष्ट्र असलेल्या भारताच्या रक्षणासाठी अन् विजयासाठी होणार्‍या शतचंडी यज्ञाचे सप्तशतीचा सामूहिक पाठ, यज्ञविधी, आहुती आणि पूर्णाहूती आदी स्वरूप असणार आहे. २० मे रोजी दुपारी ४ ते रात्री ८; २१ मे रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० आणि दुपारी ४ ते रात्री ८; २२ मे रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १.३० या वेळेत हा शतचंड यज्ञ होणार आहे.

    या यज्ञाआधी १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त राष्ट्र-धर्म आणि हिंदू समाजरक्षणासंबंधी महत्त्वपूर्ण प्रतिष्ठिंचे विचारमंथन, संतसभा आणि अन्य जागृतीपर कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळाला भेट द्या !श्री. चेतन राजहंस,प्रवक्ते, सनातन संस्था. यांची माहिती

संबंधित पोस्ट

विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे काळाची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ प्रदान सोहळा

रेवदंडा-साळाव पुलावरून २० टनांवरील अवजड वाहतुकीस बंदी-पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांचे आदेश अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

सुदर्शन आठवले यांना २०२४ चा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार जाहीर

रामनवमी शोभायात्रेच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्र्यांकडून आढावा

स्वच्छ सर्वेक्षण 2024’मध्ये आता स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’**10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर**महामहिम राष्ट्रपती श्रीम.द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्विकारला सन्मान**यशाचे श्रेय सातत्य राखणा-या स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी आणि सर्व नागरिकांचे*

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार