भारतीय सैन्याने दाखविलेल्या पराक्रमाला क्रांतीचौकात देशभक्तिपर गीतांच्या माध्यमातून भारतमातेचा जयघोष करीत सलाम करण्यात आला. देशसेवा करताना वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली
भारतीय सैन्याने दाखविलेल्या पराक्रमाला क्रांतीचौकात देशभक्तिपर गीतांच्या माध्यमातून भारतमातेचा जयघोष करीत सलाम करण्यात आला. देशसेवा करताना वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली
छत्रपती संभाजीनगर: जम्मू-काश्मिरात२६ पर्यटकांच्या निघृण हत्येनंतर भारत सरकारने पाकिस्तानमधील दहशवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्यांनी सडतोड उत्तर देत शरणागती पत्करण्यास भाग पाडले. भारतीय सैन्याने दाखविलेल्या पराक्रमाला रविवारी क्रांतीचौकात देशभक्तिपर गीतांच्या माध्यमातून आणि भारत मातेचा जयघोष करीत सलाम करण्यात आला. देशसेवा करताना वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी क्रांतीचौकात भव्य मंच उभारण्यात आला होता. मंचावर अग्रभागी वीर जवान स्तंभ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, खा. डॉ. भागवत कराड, खा. संदीपान भुमरे, खा. डॉ. कल्याण काळे, आ. प्रदीप जैस्वाल, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, शहीद जवानाची पत्नी कमल राजू गायकवाड, जवानाची पत्नी सीमा नीलेश थोरात, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी आ. किशनचंद तनवाणी, माजी आ. कैलास पाटील, अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, सुमित खांबेकर, राजेंद्र जंजाळ, पृथ्वीराज पवार, महावीर पाटणी, कु. हर्षदा शिरसाट, सिद्धांत शिरसाट आणि माजी सैनिकांची उपस्थिती होती. यावेळी सर्व पक्षीय नेते, अधिकारी आणि नागरिकांनी तिरंगा ध्वज हाती घेत जवानांच्या शौर्याला सलाम केला.
बनला तिरंगामय क्रांतीचौकाला विद्युत.रोषणाईसह तिरंगी रंगाची सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येक नागरिकाच्या हाती तिरंगा होता. शिवाय ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या शौर्याला सलाम करणारे बॅनर हातात घेऊन नागरिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.देशभक्तिपर गीतांनी वीरश्री संचारली डॉ. काळे म्हणाले की, भारतीय सैन्य दलाच्या अजोड पराक्रमामुळे पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली. सैन्याला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण भारत एक झाला आहे कार्यक्रमाचा समारोप करतान पालकमंत्री शिरसाट यांनी भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाचे कौतुक केले. शहीक जवानांच्या पाठीशी संपूर्ण देश असल्याच दाखविण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे नमूद केले.