vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुणे शहरातील तीन ठिकाणांच्याअतिक्रमण प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करावे- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे शहरातील तीन ठिकाणांच्याअतिक्रमण प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करावे- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, प्रतिनिधी : विधान मंडळ अधिवेशनादरम्यान लक्षवेधीवरील माहिती नुसार पुणे शहरातील कात्रज ,कोंढवा, येवलेवाडी या तीन ठिकाणांच्या अतिक्रमण प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करावेत. यासाठी पुणे महानगरपालिका व महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी, असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

             मंत्रालयात लक्षवेधीवरील कार्यवाहीच्या अनुषंगाने मंत्री श्री.बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार योगेश टिळेकर तसेच पुणे महानगरपालिकेचे व पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. मंत्रालयात सहसचिव सत्यनारायण बजाज, सहसचिव अजित देशमुख उपस्थित होते.

             महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले, विधिमंडळ अधिवेशनातील लक्षवेधीवरील सदर प्रकरणी केलेल्या कार्यवाहीची लवकरच प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहे.महसूल विभागाशी संबंधित विविध विषयांवरील बैठका  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाशी संबंधित विविध विषयांवरील बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या संबंधित बैठकांना राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार प्रकाश सोळंके, आमदार प्रवीण दरेकर, अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सहसचिव अजित देशमुख उपस्थित होते. भूमि अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यासह बैठकींमध्ये मोबाईल टॉवर साठीच्या जागांचे भाडेपट्टा करारातील नोंदणीच्या अडचणीबाबत चर्चा झाली. परतवाडा जि. अमरावती नगरपरिषद हद्दीतील जमिनीस वाणिज्यिक वापरासाठी परवानगीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

  भूसंपादन कायद्यात केंद्र सरकारने बदल केला आहे, या अनुषंगाने राज्यातील अंमलबजावणीसाठी आणि जमिनीचे वर्ग रूपांतर करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सविस्तर प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना करण्यात आली.

    000000

000000

संबंधित पोस्ट

महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मानवीय दृष्टीकोनाने अचूक कर्तव्य पार पाडावे- पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार- महसूल विभाग शासनाचा कणा व चेहरा असल्याची भावना – महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ..

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अपमानाविरोधात सर्वहारा समाजाचा ‘महामोर्चा’

श्री संत वामनभाऊ महाराजांचे विचार पिढ्या न पिढ्या मार्गदर्शक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुवर्णकलशारोहण समारंभ

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा 3 नोव्हेंबरपासून..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट वापरास बंदी

विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन..