vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नगर विकास विभाग प्रधान सचिव डॉ.के.एच गोविंदराज यांची पनवेल महापालिकेस भेट- विविध विकास कामांचा घेतला आढावा

नगर विकास विभाग प्रधान सचिव डॉ.के.एच गोविंदराज यांची पनवेल महापालिकेस भेट- विविध विकास कामांचा घेतला आढावा

रायगड प्रतिनिधी: नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच गोविंदराज यांनी पनवेल महापालिकेस सदिच्छा भेट देऊन पनवेल महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला.

 यावेळी आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त सर्वश्री डॉ. वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, स्वरूप खारगे, मुख्य लेखा वित्त अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखापरीक्षक निलेश नलावडे,शहर अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त सर्वश्री सुबोध ठाणेकर, श्रीराम पवार, डॉ.रूपाली माने, उपअभियंता विलास चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.भगवान गीते, डॉ.मधुलिका लाड,कार्यकारी अभियंता सुधीर सांळुखे, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर उपस्थित होते.

 बैठकीत महापालिकेच्या विविध विकास कामांचे संगणकीय सादरीकरण द्वारे आयुक्तांनी प्रधान सचिवांना सविस्तर माहिती दिली. महापालिकेच्या विविध विकास कामांबद्दल प्रामुख्याने शिक्षण विभाग, पशुसंवर्धन विभाग, पाणीपुरवठा, आपत्तीकालीन परिस्थिती यासंदर्भात प्रधान सचिव के.एच गोविंदराज यांनी सविस्तर माहिती घेऊन मार्गदर्शन केले.      महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजेनेची,बांधकाम विभागाच्यावतीने सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची ,महापालिकेने सुरू केलेल्या महत्वपूर्ण अशा ‘पनवेल कनेक्ट ॲपची माहिती आयुक्तांनी दिली. या कामांबद्दल प्रधान सचिवांनी समाधान व्यक्त केले, वैद्यकिय आरोग्य विभागाची माहिती देताना आयुक्तांनी येत्या काही दिवसात महापालिकेच्यावतीने खारघर व खांदा कॉलनीमध्ये उभारण्यात येणाऱ्या डायलीसीस सेंटर विषयीची तसेच अमृत योजनेंतर्गत सूरू असलेल्या कामांची, माहिती देखील त्यांना देण्यात आली. महापालिकेच्या एआयच्या माध्यमातून करण्यात आलेल्या श्वान सर्वेक्षणाविषयी व त्याबाबतचे संगणकीय सादरीकरण प्रधान सचिव महोदयांनी पाहिले.

*विविध विकास कामांना भेट*याचबरोबर महापालिकेच्या विविध विकास कामांना प्रधान सचिव के.एच गोविंदराज यांच्या स्थळ भेटी दिल्या. यामध्ये अमृत योजनेंतर्गत पनवेलमधील एसटीपी प्लॅन्ट, पनवेल मधील कर्मचारी श्रमसाफल्य घरकुल योजनेंतर्गत सुरू असलेल्या साईटला याचबरोबर नविन प्रशासकीय इमारत, वडाळे तलाव ,क्रिकेट अकेडमी, देहरंग धरण याठिकाणीही प्रधान सचिव के.एच गोविंदराज यांनी भेट दिली..

………..

संबंधित पोस्ट

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर*

गव्‍हाच्‍या साठयावर निर्बंध; दर शुक्रवारी माहिती देणे अनिवार्य..

vishwatmaklokswamivarta

अकोल्याचे ३० बालवैज्ञानिक विद्यार्थी निघाले इस्त्रो वारीला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दाखवली हिरवी झेंडी..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय #क्रीडा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात दिली. तसेच, जिल्ह्यात आधुनिक क्रीडा संकुल उभारणार असल्याची घोषणाही- मंत्री आशिष शेलार

राज्यपालांच्या हस्ते ८३ पोलीस अधिकारी, अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान राजभवन येथे राष्ट्रपती पोलीस पदकअलंकरण कार्यक्रम संपन्न..

रि-केवायसी करून खाते अद्यावत करा जिल्हा अग्रणी व्यवस्थापक नितीन तळपे यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta