vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजपा नेते आ रमेशआप्पा कराड यांच्याकडून खरोळा येथील पिंपळे परिवाराचे सांत्वन

भाजपा नेते आ रमेशआप्पा कराड यांच्याकडून खरोळा येथील पिंपळे परिवाराचे सांत्वन

         राज्य प्रतिनिधी -अचानकपणे वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊसात विजेचा शॉक लागून झालेल्या दुर्देवी घटनेत भाजपाचे कार्यकर्ते खरोळा येथील शेतकरी महारूद्र (राजाभाऊ) बसवंतआप्पा पिंपळे यांचे दुःखद निधन झाल्याचे समजल्याने भाजपाचे नेते लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी गुरुवारी खरोळा येथे जाऊन पिंपळे परिवाराचे सांत्वन केले व धीर दिला.

        अत्यंत सामान्य कुटुंबातील राजाभाऊ पिंपळे यांच्या अकाली निधनाने कुंटूबावर मोठे दुःख कोसळले आहे. भाजपाचे नेते आ श्री रमेशआप्पा कराड यांनी गुरुवारी दुपारी खरोळा येथे जाऊन पिंपळे परिवाराची भेट घेतली. यावेळी मयत महारुद्र यांचे वडील बसवंतआप्पा पिंपळे, आई मन्याबाई, पत्नी मिनाबाई, मुलगा ‌‌अवधूत, मुलगी मेघा ‌‌आणि अमृता यांच्याकडून घडलेल्या घटनेची माहिती घेऊन सांत्वन केले व वैयक्तिक मदत केली. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून पिंपळे कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या. याप्रसंगी आ कराड यांच्यासमवेत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, प्रदीप पाटील खंडापूरकर, ओबीसी मोर्चाचे भागवत सोट, पंचायत राज सेलचे नवनाथ भोसले, मंडल अध्यक्ष महेंद्र गोडभरले यांच्यासह इतर अनेकांची उपस्थिती होती.

          यावेळी बाळूअप्पा हेने, हनुमंतकाका राऊतराव, प्रताप राऊतराव, राजकुमार मानमोडे, ‌ मोहन सुभान राऊतराव, विजयकुमार शिंदे, ‌‌ केदारनाथआप्पा पिंपळे, केदारनाथ सपकाळ, गोविंद आडतराव, रमाकांत फुलारी, सत्यवान राऊतराव, ‌संगमेश्वर ततापुरे, सोमनाथ चापोले, डॉ महेंद्र पिंपळे, राजेश्वर उकर्डे, पुंडलिक आदुडे, वैजनाथ भालेकर, बालासाहेब आडतराव, ‌संजय पिंपळे, राहुल कपाळे, ‌ईबा पिंपळे, भागवत अडतराव, सिद्धू मदने, मच्छिंद्र कपाळे, बाळू पाटील, विश्वंभर रवळे, जगन्नाथ रवळे, ‌‌संदीप पिंपळे, ‌‌मंगेश पिंपळे, ‌वैजनाथ घोडके, पद्माकर मोतमफळे‌‌, ‌‌अंकुश डोके, बालाजी बावचकर. ज्ञानोबा भोपी, भय्या दीक्षित ‌यांच्यासह इतर अनेक जण होते

संबंधित पोस्ट

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर निधी मार्चपूर्वी शंभर टक्के खर्च करा – सहपालकमंत्री आशिष जयस्वाल*

२०३४च्या फुटबॉल विश्वचषकासाठी ‘प्रोजेक्ट महादेवा’ मधून गुणवान खेळाडू मिळतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा’चा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागात वैद्यकीय उपचारांबाबत जागरूकता वाढवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा ,जादूटोणा विरोधी कायद्याच्या जनजागृती समितीचा आढावा,बोगस डॉक्टर पकडण्यासाठी धाडसत्र राबविण्याचे निर्देश..

श्री रामाच्या जयघोषासह मंत्रोच्चारात सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा संपन्न सिंहस्थ कुंभमेळा २०२७ यशस्वी करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक-गिरीश महाजन

नागपूर, कोराडी येथील माविमअंतर्गत प्रकल्प तातडीने सुरू करण्याचेमहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश· नागपूर कोराडी प्रकल्पामुळे हजारो महिलांना रोजगार उपलब्ध होणार…

शहापूर येथील पद्मश्री सिंधुताई सपकाळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वामी विवेकानंद जयंती दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’म्हणून साजरा

vishwatmaklokswamivarta