vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गिरगाव चौपाटीवर प्लास्टिक निर्मूलन स्वच्छता मोहिम एकल प्लास्टिकचा वापर टाळण्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गिरगाव चौपाटीवर प्लास्टिक निर्मूलन स्वच्छता मोहिम एकल प्लास्टिकचा वापर टाळण्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन

मुंबई, प्रतिनिधी: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटी येथे एकल प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. वसुंधरेच्या संरक्षणासाठी पर्यावरण विभागाने पाऊले उचलली असून नागरिकांनी एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन मंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी केले.

 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बृहन्मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गिरगाव चौपाटी येथे एकल प्लास्टिक निर्मूलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी व सामान्य नागरिक उपस्थित होते.

  यावेळी मंत्री श्रीमती मुंडे व श्री. कदम यांनी गिरगाव चौपाटीची पाहणी करून या ठिकाणी कशा प्रकारे स्वच्छता केली जाते याची माहिती घेतली. तसेच त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर स्वच्छताही केली. मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने राज्यात 22 मे पासून एकल वापर प्लास्टिक मुक्तीसाठी मोहीम राबविण्यात येत आहे. एकल वापर प्लास्टिकला नाही म्हणायचे असून त्याचा वापर पूर्णपणे बंद करायचे आहे. त्या प्लास्टिकचा पुनर्वापर कसा करायचा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी विविध ट्रस्टचा सहभाग घेत आहोत. विविध धार्मिक स्थळ, रुग्णालये, औषधांची दुकाने आदी विविध ठिकाणी प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी जनजागृती करत आहोत.

झाडे लावून ती जतन करा, प्लास्टिकचा वापर करणे टाळा, पाण्याची बचत करा, सौरऊर्जा, सायकल वापरणे यासारख्या पर्यावरणपूरक पर्यायांची निवड करा, कापडी पिशव्या वापरा याबाबत जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमात विविध संस्थांनी पथनाट्याद्वारे एकल वापराच्या प्लास्टिक बंदीसंदर्भात जनजागृती केली. यावेळी मुक्ताई घनकचरा व्यवस्थापन सेवा संस्था या संस्थेचे सदस्य तसेच जोशी-बेडेकर महाविद्यालयासह विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकल वापराच्या प्लास्टिकविरुद्ध घोषवाक्याद्वारे जनजागृती केली व चौपाटीतील कचरा स्वच्छ करून स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.

000000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, पंजाब, गुजरात, मणीपुर मधील 300 कलावंत-सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकर वारसा सह्याद्रीचा एम.आय.टी. महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर, येथे होणार भव्य सांस्कृतिक कार्यक्रम,पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार सांस्कृतिक कार्यक्रम…

मराठी तरुणांनी आवडीच्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे -मराठी पाऊल पडते पुढे या चर्चासत्रातील सूर..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राचे देशाच्या योगदानात मोठा वाटा : केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार,नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा पुढचे पाऊल तर्फे सत्कार विविध योजनांच्या माध्यमातून मराठी टक्का वाढविण्याचा महाराष्ट्र शासनाचा भक्कम पाठिंबा..

नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मॅजिक आयटीआय जालना इन्क्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना उद्योजक होण्याची संधी: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा  ‘मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर’ चे उद्घाटन 

vishwatmaklokswamivarta

महसूल वसुली पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे – विभागीय आयुक्त श्वेता सिंघल