vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र सदनात कंपोस्ट पिट प्रकल्पाचे निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते भूमिपूजन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र सदनात कंपोस्ट पिट प्रकल्पाचे निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते भूमिपूजन

नवी दिल्ली, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कोपर्निकस मार्कस्थित महाराष्ट्र सदनात कंपोस्ट पिटच्या प्रकल्पाचे भूमिपूजन निवास आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते करण्यात आले. या पर्यावरणपूरक उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्र सदन परिसरातील पालापाचोळा आणि दोन उपाहारगृहामधून निघणाऱ्या जैविक कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन करून सेंद्रिय खत तयार करणे असा असल्याचे निवासी आयुक्त आर. विमला यांनी यावेळी सांगितले.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदन परिसरात असलेल्या मुबलक झाडांमुळे दररोज मोठ्या प्रमाणात पालापाचोळा आणि दोन्ही उपाहारगृहामधून उरलेला भाजीपाला, तसेच इतर सेंद्रिय कचरा जमा होतो. या कचऱ्याचा पर्यावरणपूरक पद्धतीने वापर करण्यासाठी तीन टन क्षमतेचे दोन कंपोस्ट पिट्स उभारण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांच्या सामूहिक चर्चेतून घेतला असल्याचे सांगून निवासी आयुक्त आर विमला म्हणाल्या, या पिटमधून तयार होणारे सेंद्रिय खत परिसरातील विस्तीर्ण बागा आणि झाडांना पोषक ठरेल, ज्यामुळे हरित क्षेत्र अधिक समृद्ध आणि टिकाऊ होईल.

हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. कंपोस्ट पिटमुळे जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन प्रभावीपणे होईल आणि नैसर्गिक खतामुळे महाराष्ट्र सदनातील बागांचे सौंदर्य तसेच पर्यावरणीय समतोल वाढेल, असेही निवासी आयुक्त आर.विमला यांनी यावेळी सांगितले

या भूमिपूजन कार्यक्रमात सहाय्यक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार, स्मिता शेलार, सारिका शेलार, व्यवस्थापक प्रमोद कोलते, निवासी अभियंता किरण चौधरी, अभियंता जे.पी. गंगवार, कनिष्ठ अभियंता प्रियंका नागे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते

0000

संबंधित पोस्ट

मुंबई लोकल ट्रेनमधील हत्येचा उलगडा: २४ तासांच्या आत आरोपीला अटक

vishwatmaklokswamivarta

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले पाऊल …प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कारवाई

vishwatmaklokswamivarta

आत्मविश्वास, इच्छाशक्ती, कठोर परिश्रमाची तयारी व अभ्यासात सातत्य ठेवा, यश हमखास मिळेल,कौतुक सोहळा : आमदार नारायण कुचे यांचा इयत्ता दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सल्ला…

आचारसंहिता क्षेत्रातील ७६ जणांना २४ तासांत शस्त्र जमा करण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta

मेळघाटातील कुपोषण नियंत्रणासाठी उपाययोजना करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

नागपूर बोर्डात समस्या निवारण सभाआमदार सुधाकर अडबाले यांच्‍या पुढाकाराने विविध विषयांवर चर्चा..