vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एक झाड, अनेक उपयोग” – पर्यावरण दिनी जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांचा हरित संदेश

“एक झाड, अनेक उपयोग” – पर्यावरण दिनी जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांचा हरित संदेश

जालना,  (प्रतिनिधी) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिनांक ५ जून २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता स्त्री रुग्णालय, गांधीचमन, जालना येथे “एक पेड माँ के नाम” या भावनिक आणि प्रेरणादायी संकल्पनेखाली वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. या उपक्रमांतर्गत फळझाडे, औषधी वनस्पती व छायादायक झाडांची लागवड करण्यात आली. पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सहभागी सर्वांनी वृक्षसंवर्धनाचा शपथविधी केला व हिरवे भविष्य घडवण्याचा संकल्प केला.

यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित करताना, “वृक्ष ही निसर्गाची संपत्ती असून भावी पिढ्यांना शुद्ध हवामान आणि हिरवे जग सोडण्यासाठी आजच झाडे लावणे आणि त्यांचे जतन करणे आवश्यक आहे,” असे थोडक्यात मार्गदर्शन केले.

यावेळी विमलताई आगलावे, विजय कामड, बद्रिनाथ पठाडे, अशोक अण्णा पांगारकर, सतीश जाधव, सोपान पेंढारकर, संध्याताई देठे, अरुणाताई जाधव, महेश निकम, संजय डोंगरे, प्रा.राजेंद्र भोसले, वैशाली बनसोड, पुष्पा मेत्रे, आशा भाले ,रेणुका बोटुळे, रेणुका फुलमामडीकर, विष्णू बापू डोंगरे, गोवर्धन कोल्हे, सिद्धेश्वर हाजबे अप्पा, सुनिल पवार, सुहास मुंडे, सोमेश काबलिये, इम्रान सय्यद, प्रशांत गाडे, सोमनाथ गायकवाड, कृष्णा गायके, ओम कळकुंबे, गणेश खरात, शाम उगले, राजाराम जाधव, गौरव गोधेकर तसेच रुग्णालयाचे प्रमुख डॉ. गवारे व त्यांच्या आरोग्यसेविका व कर्मचारीवृंद कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी झाले.

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाठा यांच्यात नाशिक बैठकीत वाद विवाद तुफान राडा, नेते बैठक सोडून गेले

देहदान, अवयव दान हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा.एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठात डॉ. सुशील मेश्राम यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिरात नमुंमपा समाजविकास विभागाच्या योजनांचेही माहिती प्रसारण

छत्तीसगड राज्यात लव्ह जिहाद व धर्मांतरविरोधी कठोरकायदा करणार मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचे आश्वासन !हिंदु जनजागृती समिती व हिंदुत्वनिष्ठ यांची छत्तीसगडचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह बैठक..

vishwatmaklokswamivarta

पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रारूप मतदार याद्या आज प्रसिध्द होणार

vishwatmaklokswamivarta

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक‘राह-वीर’ रस्ते अपघातप्रसंगी मदत करणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्यायोजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी