vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिवाजी महाराज सर्किट’ विशेष रेल्वेचे माणगाव येथे आगमन**पर्यटक पहिल्या दिवशी देणार रायगड किल्ल्याला भेट*

*शिवाजी महाराज सर्किट’ विशेष रेल्वेचे  माणगाव येथे आगमन**पर्यटक पहिल्या दिवशी देणार रायगड किल्ल्याला भेट*

 

रायगड प्रतिनिधी- भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरटीसीटी) ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. ही यात्रा ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ अंतर्गत उद्या दि. ९ जून २०२५ पासून सुरू होत असून पहिल्या दिवशी रायगड किल्ला येथे भेट देणार आहॆत.

या ५ दिवसांच्या विशेष प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. ही विशेष रेल्वेचे उद्या सकाळी 10.30 वा माणगाव रेल्वे स्थानक येथे आगमन होणार आहॆ. सर्व प्रवासी रायगड किल्ले येथे भेट देणार आहेत. सायंकाळी 5 वा रेल्वेने पुणे कडे प्रयाण करणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट शुभारंभ दिनांक: ९ जून २०२५ कालावधी: ५ दिवस / ६ दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती) प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई प्रवास सुरु व संपण्याचे स्थानक : दादर, ठाणे🚆 यात्रेचा प्रवासमार्ग –मुंबई (सीएसएमटी)-रायगड-पुणे-शिवनेरी-भीमाशंकर-प्रतापगड-कोल्हापूर-पन्हाळा- मुंबई.

🏰 प्रमुख स्थळांची माहिती –

 रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती. लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले. कसबा गणपती व शिवसृष्टी,पुणे –पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय. शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ. भीमाशंकर ज्योतिर्लिंग – १२ ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ. प्रतापगड किल्ला – अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण. कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेचे 366.80 कोटींचे विक्रमी करसंकलन ! कर संकलनात योगदान देणाऱ्या करदात्यांचे महापालिकेकडून आभार; 1 जुलैपासून विलंब दंड लागू!

अवैध धंद्यांसाठी ड्रोनचा वापर करणाऱ्या गौणखनिज व रेती माफियांवर कठोर कारवाई करापालकमंत्री ना. मकरंद पाटील यांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निर्देश..

vishwatmaklokswamivarta

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबतच्या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार

vishwatmaklokswamivarta

मैदान गाजवले, मनेही जिंकली; महसूल क्रीडा स्पर्धेत जालना जिल्ह्याचा डंका • जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रत्यक्ष सहभागाने खेळाडूंमध्ये संचारले नवचैतन्य 

माओवाद विरोधातील लढ्यात महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक यश-किमान तीन वर्षे सी-६० मध्ये सेवा बजावणाऱ्या जवानांना राज्य शासनामार्फत विशेष ‘सी-६० पदक’ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव या अतिदुर्गम आदिवासी भागांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत कार्यरत राहून आरोग्यसेवेचा दीप अखंड तेवत ठेवणाऱ्या सात आरोग्य योद्ध्यांचा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सत्कार