vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुणे जिल्ह्यातील मावळ  तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू. ३२ जण जखमी, बचावकार्य सुरु, दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख.

पुणे जिल्ह्यातील मावळ  तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू. ३२ जण जखमी, बचावकार्य सुरु, दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख.

राज्य प्रतिनिधी-पुणे जिल्हयातल्या मावळ तालुक्यातल्या कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू.३२ जण जखमी, बचावकार्य सुरु, दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर बांधलेला जुना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. याठिकाणी फिरायला आलेले २५-३० पर्यटक हा पूल पडल्याने वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मावळ तालुक्यातल्या कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत २५ ते ३० पर्यटक नदीत बुडाल्याची भीती.

प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू, ३२ लोक जखमी असून, सहा जण गंभीर जखमी.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले की पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले.

या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे.

6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

संबंधित पोस्ट

क्रीडा क्षेत्राला निधी देऊन आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडविणार   – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पावसामुळे सिंचन विहिरी कोसळल्याने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या -विविध मागण्यांचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचे केंद्रीय कृषी कृषीआणि किसान कल्याण मंत्र्यांना निवेदन उपतालुकाप्रमुख ठोंबरेंनी दिले दिल्लीला जावून कृषी मंत्र्यांना निवेदन

केरा व मणदुरे उपसासिंचन योजनेचा आराखडा तयार होतात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर पुरस्काराने सन्मानित..

नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणन आवश्यक; जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन – रणजितसिंह राजपूत

vishwatmaklokswamivarta

आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खापरखेड्यात तिरंगा यात्रेचे आयोजन