vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांना सूचना देण्याचे आवाहन

क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांना सूचना देण्याचे आवाहन

सांगली, द प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने विकसित महाराष्ट्र 2047 या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत राज्यातील क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जनतेचे बहुमत तसेच योजना जाणून घेण्यासाठी ऑनलाईन विशेष सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. राज्यातील क्रीडा क्षेत्राची सद्यस्थिती, भविष्यातील अपेक्षा, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये खेळाडुंची कामगिरी उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना त्याचबरोबर लोकप्रिय खेळांचा प्रचार व प्रसार यासंबंधी सूचना नागरिकांनी https://forms.gle/d9fcxXWje8AphqpX9 या लिंकवर जावून गुगल फॉर्मव्दारे द्याव्यात, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटक, क्रीडाप्रेमी शासकीय अधिकारी आणि सामान्य नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन मते व्यक्त करावीत. या उपक्रमातून संकलित होणाऱ्या सूचना व मते यांचा उपयोग राज्याचे क्रीडा धोरण अधिक व्यापक आणि खेळ व खेळाडू केंद्रीत करण्यासाठी होणार आहे. क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांना आपले मत नोंदविता येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन सूचना द्याव्यात. जेणेकरून महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्र जागतिक स्तरावर आपले नावलौकिक मिळवेल, असे आवाहनही श्री. बोरवडेकर यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मुंबई विभागीय निवड चाचणी १३ ऑगस्ट रोजी..

अंकित राठोडने लॅब मास्टर चॅम्पयनशिपमध्ये स्पर्धत सर्वप्रथम क्रमांक पटकावला  १५ विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला

नमुंमपा जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या चुरशीच्या लढती

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्यायच्या राज्यस्तरीय स्पर्धेतअमरावती विभागाला सर्वसाधारण विजेतेपद

नगरविकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा-छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, नांदेड, लातूर विजेते…

vishwatmaklokswamivarta

युवकांनी विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग क्विझमध्ये सहभागी व्हावे-जिल्हा युवा अधिकारी प्रणीत सांगवीकर यांचे आवाहनØ सर्वोत्तम स्पर्धेकांचा गौरव होणार

vishwatmaklokswamivarta