vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५ यावर्षी ७ नाेव्हेंबर रोजी आयोजित

जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५ यावर्षी ७ नाेव्हेंबर रोजी आयोजित

खेळ प्रतिनिधी-युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने प्रतिवर्षी आयोजित केला जाणारा जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५ यावर्षी ७ नाेव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. इच्छुकांनी आपली नोंदणी ४ नोव्हेंबरपर्यंत https://forms.gle/Kmof5utKSuEqL3Pb9 या गुगल फॉर्मद्वारे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या “विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” अंतर्गत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सन २०२५-२६ मधील राष्ट्रीय युवा महोत्सव (Viksit Bharat Challenge Track) चे राष्ट्रीय आयोजन १० ते १२ जानेवारी २०२६ या दरम्यान होणार असून त्यासाठीची जिल्हास्तरीय निवड म्हणून या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत वक्तृत्व,कथा लेखन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत, कविता लेखन, नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेत १५ ते २९ वर्षे वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. स्पर्धांबाबतची सविस्तर माहिती www.dsomumbaicity.blogspot.com या ब्लॉगवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा युवा महोत्सव (स्पर्धा प्रमुख) अनिल घुगे यांच्याशी +91 95943 69561 या क्रमांकावर संपर्क साधावा.

संबंधित पोस्ट

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागासाठी30 सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणी करावी

गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी गावा गावात क्रीडा सुविधांसाठी ५० कोटी रुपयांची तरतुद- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

नोएडातील राष्ट्रीय कराटे स्पर्धेत जालना जिल्ह्याची सुवर्ण झेप,जालन्यात विजेत्या कराटेपटूंचे जल्लोषात स्वागत; महापौर वंदना मगरे यांच्या हस्ते सत्कार, अक्षय गोरंट्याल यांची उपस्थिती, शहरातून विजयी रॅली

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुलढाण्यात महिला मॅरेथॉनचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

इयत्ता 10 वी व 12 वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांसाठी क्रीडा सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

मुंबई शहर जिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा विकास केंद्र – निवड चाचण्यांसाठी१९ एप्रिल पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन