vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वरदायनी माता मंदिर परिसरातील पूल धोकादायक स्थितीत; वाहतुकीस तात्काळ बंदी..

वरदायनी माता मंदिर परिसरातील पूल धोकादायक स्थितीत; वाहतुकीस तात्काळ बंदी..

राज्य प्रतिनिधी -वरदायनी माता मंदिर परिसरातील पूल धोकादायक स्थितीत; वाहतुकीस तात्काळ बंदी..उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, महाड यांच्या अधिनस्त कार्यक्षेत्रातील सर्व पुलांची अलीकडेच पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान वाळणकोंड, ता. महाड येथील वरदायनी माता मंदिर परिसरातील केबल स्टे ब्रिज अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुमारे १९९०च्या दशकात बांधलेला हा पूल सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, ब्रिजवरील सर्व केबल्स खराब आणि निकामी झालेल्या आहेत, त्यामुळे या पुलावरून पादचारी वाहतुकीचा कोणताही प्रकार अत्यंत धोकादायक ठरू शकतो.जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०२३ मध्ये एकदा दुरुस्ती केली गेली होती, परंतु त्यानंतरही पूल पूर्णपणे सुरक्षित झालेला नसून, कोणतीही अनुचित घटना घडण्याचा धोका कायम आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खालील तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

सदर पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक व पादचारी चालन तत्काळ बंद करण्यात यावी.जिल्हा परिषद रायगड यांना याबाबत तातडीने सूचना पाठवण्यात याव्यात.सदर ठिकाणी २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, जेणेकरून नागरिक पुलावर प्रवेश करणार नाहीत.नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून सदर पुलावरून जाणे टाळावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक संपन्न; नियोजित उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे निर्देश

राज्यघटनेमुळे देशातील कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधीn- सरन्यायाधीश भूषण गवई मराठी माणूस सर्वोच्चपदी पोहोचल्याचा सार्थ अभिमान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडानिमित्त विशेष संवाद व कृती कार्यक्रम संपन्न

प्राण्यांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी चेकपोस्टवर भरारी पथकांनी तपासणी करावी-जिल्हाधिकारी विनय गौडा जी .सीकत्तलखान्यास भेट देऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

शिक्षण परिषदेतून शिक्षकांना मिळणार सकारात्मक शिस्तीचे धडे- मंत्री दादाजी भुसे..

vishwatmaklokswamivarta

माफिया डॉन अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली, गीता आणि योगिता गवळी येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अखिल भारतीय सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढणार

vishwatmaklokswamivarta