vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडानिमित्त विशेष संवाद व कृती कार्यक्रम संपन्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडानिमित्त विशेष संवाद व कृती कार्यक्रम संपन्न

जालना, प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत जालना लघुपाटबंधारे व जालना पाटबंधारे विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा-2026’ निमित्त बुधवार दि.22 एप्रिल रोजी कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर येथे विशेष संवाद व कृती कार्यक्रम संपन्न झाला.

राहुल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र बदनापूरचे समन्वयक डॉ. एस. डी. सोमवंशी, अजिंक्य शिनगारे आणि मुख्य वक्ते म्हणून डॉ. अश्विनी बोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता अ. प. शिनगारे, एस. एम. शेळके, सहाय्यक कार्यकारी अभियंता जी. पी. पवार आणि उपविभागीय अभियंता व्ही. डी. ढाकने, डी. ए. शास्त्री, के. डी. मोहिते यांसह जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रामुख्याने पाणी वापराचे सुयोग्य नियोजन आणि शाश्वत जलव्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात आली. कृषी क्षेत्रात पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती (ठिबक व तुषार सिंचन) आणि पीकनिहाय पाणी नियोजनाचे महत्त्व तज्ज्ञांनी पटवून दिले. जलस्रोतांच्या संवर्धनामुळे उत्पादनात वाढ आणि पाण्याची बचत कशी साध्य करता येते, यावर मार्गदर्शन करतानाच उपस्थित शेतकरी व लाभार्थ्यांना प्रत्यक्ष कृती आराखडा समजावून सांगण्यात आला. चला, जलसंपदा जपूया आणि शेती समृद्ध करूया हा संदेश देत जल आणि कृषी यांच्या समन्वयाद्वारे शाश्वत भविष्याकडे वाटचाल करण्याचा निर्धार या उपक्रमाद्वारे व्यक्त करण्यात आला.

-*-*-*-*

संबंधित पोस्ट

जालना शहरातील चार परीक्षा केंद्रांभोवती 200 मीटर परिसरात जमावबंदी लागू- 31 मे रोजी परीक्षा केंद्र परिसरात कलम 163 लागू 

ऑपरेशन सिंदूरचा समग्र राजकीय-लष्करी उद्देश पाकिस्तानला छुपे युद्ध लढल्याबद्दल शिक्षा करणे हा होता; पाक-पुरस्कृत दहशतवाद ही एक सुनियोजित रणनीती आहे : लोकसभेत संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन

15 एप्रिल रोजी तीसऱ्या विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित

एड्स जनजागृतीसाठी सांगलीत रेड रन मॅरेथॉन संपन्न

आपले सरकार’ पोर्टलच्या अद्ययावतीकरणामुळे १० ते १४ एप्रिल या काळात सेवांमध्ये तात्पुरती खंडितता

लोकशाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या स्मारकासाठी निधी देणार**महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे स्मारक उभे करा-उपमुख्यमंत्री अजित पवार*

vishwatmaklokswamivarta