vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त डॉक्टरांना दिल्या शुभेच्छा

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त डॉक्टरांना दिल्या शुभेच्छा

         नवी मुंबई प्रतिनिधी -आज 1 जुलै रोजीच्या राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नेरूळ येथील महानगरपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयास भेट देत, अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांचेसह डॉक्टर्सना गुलाबपुष्प देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, उपआयुक्त डॉ.अजय गडदे, नेरूळ रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.उध्दव खिल्लारे आणि इतर डॉक्टर्सना सन्मानीत करण्यात आले.

 आपल्या देशातील डॉक्टरांच्या अथक सेवेचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचे कृतज्ञ स्मरण ठेवून 1991 पासून दरवर्षी 1 जुलै हा दिवस ‘राष्ट्रीय डॉक्टर्स डे’ म्हणून संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. 1 जुलै 1882 रोजी सुप्रसिध्द चिकित्सक आणि प.बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ.बिधानचंद्र रॉय यांचा जन्म झाला होता व त्यांचा मृत्यूही 1 जुलै रोजीच सन 1962 मध्ये झाला होता. त्यांचे या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान लक्षात घेऊन हा डॉक्टर्स डे साजरा करण्यात येतो.

    डॉक्टर हे समाजातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत. आजारी व्यक्तींच्या केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही डॉक्टर मनापासून काम करतात. कोव्हीड काळात डॉक्टरांनी दाखवलेली समर्पण भावना आणि धैर्य लक्षणीय होते. डॉक्टरांच्या या अविरत जनहिताय कार्याची कृतज्ञता व्यक्त करीत महानगरपालिकेच्या सर्व रूग्णालयात डॉक्टरांना शुभेच्छा देण्यात आल्या.

    सर्वच रूग्णालयांमध्ये आज केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘स्वच्छता अपनाओ – बिमारी भगाओ’ या अभियानाचा प्रारंभ विविध उपक्रम राबवून उत्साहाने साजरा करण्यात आला.

संबंधित पोस्ट

मानसिक व शारीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रम्हे जिल्हा न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४२ वी वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न-जिल्हा बँकेची ४२ वी वार्षीक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

vishwatmaklokswamivarta

बाल हक्क संदर्भात 21 नोव्हेंबर रोजी एक दिवसीय परिषदेचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta

मत्स्यव्यवसाय विभागाच्या व्हीजन डॉक्युमेंट 2047 मध्ये सर्वसमावेशकता असावी- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे,वातावरण बदलामुळे होणाऱ्या परिणामांवर  उपाययोजनांचा प्रामुख्याने समावेश असावा

3000 हून अधिक नागरिक सहभागातून नवी मुंबई परिसरामध्ये महा स्वच्छता अभियान

वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना- वनमंत्री गणेश नाईक

vishwatmaklokswamivarta