vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महिला व बालविकास विभागाने योजनांची अंमलबजावणी करताना मानवी दृष्टिकोन ठेवावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 महिला व बालविकास विभागाने योजनांची अंमलबजावणी करताना मानवी दृष्टिकोन ठेवावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, प्रतिनिधी : देश जगातील अग्रणी अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करीत असताना महिला व मुलांची स्थिती सुधारली नाही तर केवळ आर्थिक प्रगतीला महत्त्व राहणार नाही असे सांगून महिला व बालविकास विभागाने आपल्या योजनांची अंमलबजावणी करताना आपुलकीची भावना व मानवी दृष्टिकोन ठेवावा तसेच अधिकाऱ्यांनी सांघिक भावनेने कार्य करावे, अशी सूचना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केली.राज्यपाल राधाकृष्णन यांनी महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा विशेषत: ‘वन स्टॉप सेंटर’ व ‘मिशन शक्ती’ या योजनांचा राजभवन येथे आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे, उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, आयसीडीएसचे आयुक्त कैलास पगारे तसेच महिला व बालविकास विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.महिला व बालविकास विभागाकडे समाजातील महिला, बालके व विशेषतः निराधार अनाथ मुलांच्या विकासाची महत्त्वाची जबाबदारी आहे असे सांगून आदिवासी मुला-मुलींमधील शिक्षण मध्येच सोडण्याचे प्रमाण कमी करण्याकरिता विशेष प्रयत्न झाले पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यापीठांमध्ये शिक्षण, निवास, भोजन आदी सुविधा मोफत उपलब्ध आहेत याची माहिती दिली गेल्यास त्यांचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढेल. अनाथ मुलांसाठी शासकीय सेवेत आरक्षण ठेवण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय क्रांतिकारी आहे. विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावी होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी मंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावांना भेटी दिल्या पाहिजे, लाभार्थ्यांना भेटले पाहिजे तसेच गाव पातळीवरील प्रत्यक्ष अडचणी जाणून घेतल्या पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी लखपती दिदी योजनेबाबत राज्यातील प्रगतीची माहिती घेतली.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी आपल्या सादरीकरणात विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या केंद्रीय व राज्यस्तरीय योजनांची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी ‘उमेद’ निलेश सागर यांनी देखील यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाबाबत सादरीकरण केले. बैठकीला राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे व उपसचिव एस. राममूर्ती हे देखील उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

उत्तराखंडमधील ढगफुटी; महाराष्ट्रातील 51 पर्यटक सुरक्षित राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती…

महाराष्ट्रात कोरोना वाढता प्रभाव, एका दिवसात 65 नवे रुग्ण, मुंबईत 22 संक्रमित, पुन्हा लॉकडाऊन ?आरोग्य विभाग नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे, मास्क घालण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याचे आवाहन

उपविभाग भामरागड : फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना

vishwatmaklokswamivarta

अजिंठा परिसराचा सर्वांगीण पर्यटन विकास साधणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई सिल्लोड-सोयगावमधील पर्यटन प्रकल्पांना गती देण्यासाठी आढावा बैठक

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली, उप समिती प्रस्ताव तयार करत असल्याची चर्चा..

vishwatmaklokswamivarta

निष्क्रिय मालमत्ता शोधण्यासाठी राज्यभर शिबिरांचे आयोजन  मुंबई उपनगरात 21 नोव्हेंबरला मेळावा…

vishwatmaklokswamivarta