vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन…

              राज्य प्रतिनिधी -आषाढी शुद्ध एकादशी निमित्ताने वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला.

 वातावरण टाळ, मृदंग आणि विठू माऊलीच्या नाम गजरात भक्तीरसात न्हाऊन निघाले. प्रारंभी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे श्री माऊलींची प्रतिमा देऊन स्वागत केले.

 वाखरी येथे जिल्हा प्रशासनामार्फत वारकरी, भाविक यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणी देखील मुख्यमंत्री फडणीस यांनी केली. वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

   यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर, अभिजित पाटील, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी आमदार राम सातपुते यांच्यासह हजारो वारकरी भाविक उपस्थित होते.

   00000

संबंधित पोस्ट

फळ महोत्सवास भरभरून प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांच्या मेहनतीला पाठबळ द्यावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे- तीनदिवसीय फळ महोत्सवाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

लातूरच्या उदगीरमध्ये ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याच्या अंधश्रद्धेतून अघोरी विधी करण्याचा प्रयत्न; उदगीर ग्रामीण पोलिसांकडून १३ आरोपींना अटक

नद्या या भारतीय संस्कृतीच्या साक्षीदार – माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद “एक भारत, श्रेष्ठ भारत” संकल्पना अधिक दृढ करावी

जिल्हाधिकारी कार्यालयातमहात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

आपत्कालिन वाहनांना रस्त्यावर प्रवास करताना,वाहनधारकांनी मार्गिका उपलब्ध करून द्यावी- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे- आपत्कालिन वाहनांना अडथळा निर्माण झाल्यास 10 हजार रूपये दंडाची तरतूद…

vishwatmaklokswamivarta

कोळसा वाहतुकीमुळे पिकांची होणारी नुकसानभरपाई ठरवण्यासाठी समिती गठीत-मंत्री शंभूराज देसाई