vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यांतर्गत पीकस्पर्धा सन 2025-26 जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकस्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा

राज्यांतर्गत पीकस्पर्धा सन 2025-26 जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकस्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा

रायगड प्रतिनिधी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन 2025-26 साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आल्या असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकस्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन उपसंचालक कृषी (माहिती) कृषी आयुक्तालय, पुणे यांनी केले आहे.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊनदरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते.

त्यानुषंगाने अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन 2025-26 साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आल्या असून त्याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत खरीप (11) व रब्बी (05) हंगामातील एकूण 16 पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार असून, तालुका, जिल्हा व राज्य या तीन स्तरांवर स्पर्धकांची निवड होणार आहे

 पिकस्पर्धेतील पीके: खरीप पीके:-भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल, रब्बी पीके:- ज्वारी, गहू, हरभरा,करडई, जवस (एकूण ०५ पिके)

अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख : खरीप हंगाम-मूग व उडीद पिक:- 31 जुलै 2025. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल:- 31 ऑगस्ट 2025. रब्बी हंगाम:ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस :- 31 डिसेंबर 2025.

पिकस्पर्धा विजेते- सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिसाचे स्वरूप-तालुका पातळी, पहिले बक्षिस रु.5 हजार,दुसरे बक्षिस रु.3 हजार, तिसरे बक्षिस रु.2 हजार. जिल्हा पातळी पहिले बक्षिस रु.10 हजार,दुसरे बक्षिस रु.7 हजार, तिसरे बक्षिस रु.5 हजार. राज्य पातळी पहिले बक्षिस रु.50 हजार,दुसरे बक्षिस रु.40 हजार, तिसरे बक्षिस रु.30 हजार.

00000

संबंधित पोस्ट

सार्वजनिक बांधकाम विभाग-भंडारा ते गडचिरोली ९४ किलोमीटरचा द्रुतगती महामार्गभूसंपादनासह अनुषंगिक ९३१ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर येथील बालसुधारगृह प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रेणापूर तालुक्याच्या संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्षपदी श्री. सतीश आंबेकर यांची नियुक्ती… 👏🏻🎉

सर्वांना निरोगी आयुष्य दे… बळीराजासाठी चांगला पाऊस पडू दे – विठुराया चरणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घातलं साकडं विठुरायाच्या पंढरीत आयुर्वेदिक उपचार पद्धतीने केली गेली आरोग्यदायी सेवा

पुढील ५० वर्षांचा विचार करून पुण्याच्या वाहतुकीचे नियोजन करूया- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ▪️मेट्रो, बससेवा, रिंग रोड, मिसिंग लिंक, पूल व रस्ते प्रकल्पांचा एकात्मिक विकास करण्यावर भर▪️वाहतूक कोंडी, पार्किंग, अतिक्रमणे व डबल पार्किंगच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक वाहतूक समित्या स्थापन होणार▪️सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याला प्राधान्य▪️वाहतूक व्यवस्थेतील समस्या व उपाययोजनांबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांचे सादरीकरण…

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन