vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विधान परिषद इतर कामकाज न्यायमूर्ती भूषण गवई यांची सरन्यायाधीशपदी निवड महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब– उपमुख्यमंत्री अजित पवार

विधान परिषद इतर कामकाज न्यायमूर्ती भूषण गवई यांची सरन्यायाधीशपदी निवड महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब– उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई प्रतिनिधी : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या झालेल्या ऐतिहासिक निवडीबाबत विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, भारताचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची नियुक्ती ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद घटना आहे.उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, “विदर्भातील अमरावतीचे सुपुत्र असलेल्या गवई यांचे शिक्षण अमरावती आणि मुंबई येथे झाले. त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आणि समाजसेवक रामकृष्ण गवई यांचे ते सुपुत्र असून, त्यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याचे संस्कार लाभले आहेत.”

याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी विशेष उल्लेख केला की, दिवंगत नेते दादासाहेब गवई यांच्याकडून त्यांनी सामाजिक बांधिलकी आणि वंचित घटकांसाठी काम करण्याची प्रेरणा घेतली आहे. त्यांची सरन्यायाधीश पदावरील नियुक्ती ही सामाजिक समतेचा आणि न्यायाचा विजय आहे.

 

000

संबंधित पोस्ट

मराठी भाषा सक्ती : नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर दंड व मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया निश्चित

नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल’चे नियम मोडणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा ! – सुराज्य अभियान**नियम धाब्यावर बसवून वृक्षांची ‘मूक हत्या’; वृक्षारोपण केलेले १७,००० वृक्ष ‘बेपत्ता’!

जिल्ह्यातील लघु सिंचन योजनांची सातवी तसेच जलसाठ्याची दुसरी प्रगणना वेळेत पुर्ण करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

आपत्तीग्रस्त व पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमदारांच्या स्वीय सहाय्यकांचा पुढाकार# सामाजिक जबाबदारीची जाणीव जपणारा उपक्रम

vishwatmaklokswamivarta

लोकसंवादातून शासनाच्या योजनांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्यास गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा – मंत्री आदिती तटकरे कौशल्य विकास व रोजगार तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचीही माहिती नागरिकांना देण्यात आली.

vishwatmaklokswamivarta

पनवेलमधील कातकरी वस्तीला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांची भेट ; शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा”*