vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष- अवधूत म्हणजे काय ?

गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष

अवधूत म्हणजे काय ?

आध्यात्मिक वार्ता

दत्त म्हणजे (निर्गुणाची अनुभूती) दिलेला. दत्त म्हणजे ‘आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत’, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा. जन्मापासूनच दत्ताला निर्गुणाची अनुभूती होती, तर साधकांना ती यायला कित्येक जन्म साधना करावी लागते. यावरून दत्ताचे महत्त्व लक्षात येईल.

 अवधूत

१. ‘अवधूत चिन्तन श्री गुरुदेव दत्त ।’ असा जयघोष दत्तभक्त करीत असतात. त्याचा अर्थ असा – अवधूत म्हणजे भक्त. भक्तांचे चिंतन करणारे, म्हणजे भक्तांचे हितचिंतक, श्री गुरुदेव दत्त.२. संकल्प-विकल्परहित । शुद्ध सर्वांगी विभूत ।यालागीं बोलिजे ‘अवधूत’ । येर्‍हवीं विख्यात ब्राह्मणु ।।सभोंवता समस्तु । प्रपंच निजबोधें असे धूतु ।यालागीं बोलिजे ‘अवधूत’ । येर्‍हवीं विख्यात ब्राह्मणु ।।अहं धुवील तो अवधूत । तोचि योगी तोचि पुनीत ।जो का अहंकारे ग्रस्त । तोचि पतित जन्मकर्मी ।। – श्री एकनाथी भागवत ७:२७०-२७२ भावार्थासहित अर्थ : सर्व संकल्प-विकल्परहितपणाची विभूती त्याने सर्वांगाला लावलेली होती. म्हणूनच त्याला ‘अवधूत’ असे म्हणावयाचे; एरव्ही तो ब्राह्मणच होता. सभोवती असलेला सारा प्रपंच त्याने आत्मबोधाने धुऊन टाकला होता; म्हणूनही त्याला ‘अवधूत’ म्हणावे. एरव्ही तो एक विख्यात ब्राह्मण होता. ‘अहं’ जो धुतो तो अवधूत, तोच योगी आणि तोच पुनीत होय. जो अहंकारग्रस्त असतो तोच जन्मकर्मामध्ये पतित होतो म्हणून समजावे.

  श्री दत्त महाराजांना अवधूत का म्हणतात ?जो अहं धुतो तो अवधूत.!!!…. अवधूत म्हणजे विरक्त.एकदा एका भक्ताने श्रींना विचारले, “दत्ताला अवधूत कां म्हणतात ?’ त्यांचा अवतार कशासाठी झाला ?”

त्यावर श्रीमहाराज म्हणाले, “अवधूत म्हणजे विरक्त म्हणजेच विषयांचे, प्रपंचाचे प्रेम नसलेला, दत्ताचा अवतार साधकांसाठीं झाला दत्तावतार ब्रह्मा, विष्णू, महेश मिळून झाला आहे. म्हणजे त्यांचे ठिकाणी सत्व, रज, तम गुणांचा मिलाफ आहे. प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी यापैकी एक गुण प्रामुख्याने असतो. म्हणूनच कोणत्याही व्यक्तीला दत्तोपासना जास्त जवळची वाटते. दत्तोपासना करणारे लोक पुष्कळ असतात. रामाचा अवतार कर्तव्य कसे करावे हे दाखविण्यासाठी आहे, क्रुष्णाचा अवतार जीवन प्रेमाने कसे भरावे यासाठी आहे. दत्ताचा अवतार साधकाने विरक्तीने श्रीमंत कसे व्हावे हे शिकविण्यासाठी आहे. मागण्याची बुद्धि नाहीशी कर हेच मागणे दत्ताला मागावे. उपासना कोणत्याही सगुण रूपाची असली तरी ती एकाच भगवंताला पोचते, म्हणून जी ज्याची उपासना ती त्याने मनापासून करावी. गुरू, त्याने दिलेले नाम आणि भगवंत तिन्ही एकरूपच असतात. दत्त म्हणजे दिलेले, गुरू नाम देतो, नाम गुरूरूपच असते. नामांत गुरूला पाहणें हाच परमार्थ.

भगवंताचे नाम घेऊन त्याचे सतत अनुसंधान ठेवावे व त्याला शरण जावे हेच सर्वाचे सार आहे.।

संबंधित पोस्ट

श्रावण महिन्यातील वार्षिक कावड यात्रा आजपासून सुरू. कवड यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने लोक उत्तराखंडमधील हरिद्वार, गौमुख आणि गंगोत्री सारख्या तीर्थस्थळांवर गंगा नदीचे पवित्र पाणी आणण्यासाठी जातात.

जलरक्षण हेच सृष्टीसंरक्षण प्रोजेक्ट अमृत अंतर्गत देशभरात 1500 हून अधिक तरजालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी जलस्रोतांची स्वच्छता.भक्ती ही केवळ शब्दांत नव्हे, तर आचरणातून प्रकट व्हावी-सतगुरू माता सुदीक्षा जी महाराज..

*🏵️ सफला एकादशी*

vishwatmaklokswamivarta

जालना येथील घाणेवाडी येथे गुरूवारी संदल शरीफ

भारतातील सर्वात मोठ्या कला आणि संस्कृती शिखर परिषदेचा  समारोप*

vishwatmaklokswamivarta

नवीन वर्षात ज्ञानालाच मार्गदर्शक होऊ दे*  *गुरुदेव श्री श्री रविशंकर*