vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन..

 

बारामती, प्रतिनिधी: माळेगाव येथील तालुका क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, क्रीडा संकुल समिती सदस्य बापूराव तावरे आदी उपस्थित होते.

माळेगाव तालुका क्रीडा संकुल ११ एकरमध्ये साकारले असून या बहुउद्देशीय हॉलमध्ये इनडोअर तायक्वांदो, जुडो, कुस्ती, कबड्डी ,कराटे, बॅडमिंटन यासारख्या क्रीडा स्पर्धा या हॉलमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. हॉलच्या बाजूला आंतरराष्ट्रीय दर्जेच्या १० मीटर, २५ मीटर व ५० मीटर शूटिंग रेंज तसेच अद्ययावत व्यायामशाळा आदी कामे करण्यात येणार आहेत.

संबंधित पोस्ट

मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठी राबविण्यात येणारे प्रकल्प गतीने पूर्ण करा -मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी समाजाचे संघटीत राहणे गरजेचे – शंकर बाईत,पती नसलेल्या स्त्रीयांना धार्मिक कार्यक्रमात सन्मानपूर्वक वागणूक देण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे; महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईकरांचे आभार बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६

vishwatmaklokswamivarta

सुधागड तालुका आमदार सन्मान चषक श्री स्वयंभु हनुमान क्रीडा मंडळ चिवे संघाने पटकावला

vishwatmaklokswamivarta

अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन समन्वयाने काम करावे-राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

vishwatmaklokswamivarta

रोहयो’ अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना गती द्यावी- रोहयो, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

vishwatmaklokswamivarta