vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिवंगत पत्रकारांच्या नावे स्तंभ बनवा-विकासकुमार बागडी

दिवंगत पत्रकारांच्या नावे स्तंभ बनवा-विकासकुमार बागडी

जालना/प्रतिनिधी

जालना शहरात दिवंगत पत्रकारांच्या नावे एकही स्तंभ नसून या पत्रकारांचे मोलाचे योगदान राहिलेले असून त्यासाठीच त्यांच्या ही नावे शहरात एखादा तरी स्तंभ असावा आणि तो जालना शहर महापालिकेकडे व्हाईस ऑफ मिडियाचे प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी केली आहे.

यासंदर्भात श्री. बागडी यांनी म्हटले आहे की, जालना जिल्ह्यात सामाजिक आणि राष्ट्रीय काम करणारे सामाजिक कार्यकर्ता, राजकीय कार्यकर्ता, स्वातंत्र्य सैनिक, उद्योजक, माजी सैनिक आदींच्या नावाने शहरात अनेक रस्ते, चौक, कमान बांधण्यात आलेले आहेत. पण या सर्वांची कामाची प्रसिध्दी करणारे चौथा स्तभ म्हणजेच पत्रकारितेच्या नावे कुठेही आणि कोणत्याही चौकात किंवा रस्त्यावर एकही स्तभ नाही. जालना शहराच्या मध्यभागी म्हणजेच टाऊन हॉल येथे पत्रकारांसाठी स्वतंत्र स्तंभ उभारण्यात यावा, जिल्ह्यात दिवंगत झालेल्या पत्रकारांच्या नावे असा पत्रकार स्तंभ असेल तर तो चांगलाच आहे. शशिकांत पटवारी, उदय पटवारी, लक्ष्मण पायगव्हाणे, गणेश जळगांवकर, सतीष सुदामे, दिगंबर शिंदे, रमण गायकवाड, मनोहर बुजाडे, श्रीकृष्ण भारुका, शेख अलीम, अबुल हसन, राजेंद्र तिरुखे, लक्ष्मीनारायण पिपरिये, लक्ष्मीनारायण गौड, सुरेंद्र जैस्वाल, रतनलाल कुरिल, चंद्रकांत शहाणे, अनिल खंदारे आदी अनेक पत्रकार असे आहेत की, त्यांनी आपले संपूर्ण जीवन पत्रकारितेला वाहिले, परंतू त्यांच्या नावाने शहरात एखादाही स्तंभ असू नये, ही खेदाची बाब म्हणावी लागेल. म्हणूनच या सर्व दिवंगत पत्रकारांची आठवण म्हणून तरी जालना शहर महानगर पालिकेने एखादा स्तंभ शहरात उभारावा, अशी विनंतीही व्हाईस ऑफ मिडियाचे प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी केली आहे.

संबंधित पोस्ट

अकोला जिल्ह्यातील पीक विमा योजनेतीलशेतकऱ्यांना विमा रकमेचे पैसे मिळाले कृषी विभागाचा खुलासा

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना;शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन

हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी जिल्हाभर व्यापक उपक्रम….

vishwatmaklokswamivarta

देशातील पहिला सृजनशील, सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव मुंबईत;२१ जून रोजी आशा रेडिओ पुरस्काराचे वितरण- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा

vishwatmaklokswamivarta

पनवेल महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना 34 टन शाडू मातीचे मोफत वाटप!उप आयुक्त श्री. स्वरूप खारगे यांच्याकडून शाडू मातीचे वितरण व गणेशमूर्ती कारखान्याला भेट..

मराठी भाषा सक्ती : नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर दंड व मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया निश्चित