
देशाचे मोठे व्यावसायिक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये विक्रमी कमाई केली…
व्यावसायिक प्रतिनिधी-
अब्जाधीश आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये विक्रमी कमाई केली आहे. रिलायन्सचा पहिल्या तिमाहीतील नफा 78.3 टक्क्यांनी वाढून 26,994 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक नफा आहे. मुकेश अंबानी यांनी पेट्रोलियम व्यवसायानं देशांदर्गत मागणीची पूर्तता केल्याचं म्हटलं. तर, जिओ-बीपी नेटवर्कच्या सेवेद्वारे देखील चांगल्या प्रकारची वाढ झाल्याचं म्हटलं. इंधन आणि उत्पादनाच्या मार्जिनमध्ये देखील सुधारणा झाल्यानं चांगल्या कामगिरीला प्रोत्साहन मिळाल्याचं अंबानी म्हणाले.



