vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजपा जालना महानगर जिल्ह्यात “मन की बात” कार्यक्रम संपन्न”पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मार्गदर्शन हे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

भाजपा जालना महानगर जिल्ह्यात “मन की बात” कार्यक्रम संपन्न”पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मार्गदर्शन हे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जालना,  (प्रतिनिधी) – भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी आज (ता.२७) सकाळी 11 वाजता “मन की बात” या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. हा मुख्य कार्यक्रम भाजप जिल्हा कार्यालय, जालना येथे संपन्न झाला.

कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे हे स्वतः उपस्थित होते. “पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मार्गदर्शन हे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी असून, ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशहिताचे विचार, सामाजिक जाणीवा आणि नवचेतना निर्माण होते.” असे त्यांनी सांगितले.

यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, प्रदेश निमंत्रित सदस्य राजेशजी राऊत, मा.जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, सतीश जाधव, विमलताई आगलावे, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सोपान पेंढारकर, अर्जुन गेही, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, सिद्धिविनायक मुळे, देविदास देशमुख, राजेश जोशी, गोवर्धन कोल्हे, प्रशांत गाडे, सोमेश काबली, सेवकराम नारियलवाले, बाबुराव भवर, सुदर्शन काळे, गोविंद ढेंबरे, दत्ता जाधव आदीसह प्रमुख उपस्थिती होती.

तसेच सदरील कार्यक्रम भाजपा जालना महानगरातील विविध मंडळात आयोजित करण्यात आला त्यामध्ये नवीन जालना मंडळात मंडळ अध्यक्ष सुनील खरे यांच्या मार्गदर्शनाखाली, जुना जालना मंडळात मंडळ अध्यक्ष महेश निकम, पूर्व जालना मंडळात अमोल धानुरे व जालना ग्रामीण मंडळात तालुकाध्यक्ष संजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला महिला मोर्चा, युवा मोर्चा, व्यापारी आघाडी, अनुसूचित जाती-जमाती मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा, इत्यादी आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी “मन की बात” कार्यक्रम ऐकला.

संबंधित पोस्ट

मुंबईत सहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन

vishwatmaklokswamivarta

लोकअदालत ही न्यायदानाची सर्वसमावेशक लोकचळवळ : न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये-रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घघाटन; २७ हजार ८७५ प्रकरणे तडजोडीसाठी

vishwatmaklokswamivarta

तृतीयपंथीयांच्या बेकायदेशीर कृत्यांना चाप लावण्यासाठी जमावबंदीचा आदेश लागू

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील मढ गावासाठी टँकर मंजूर

वृक्षारोपण व संवर्धन सामाजिक जबाबदारी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार मेळावा.

vishwatmaklokswamivarta

अकोल्यात हिंदुत्वाचा महाहुंकार: ‘भारताला अधिकृतपणे हिंदु राष्ट्र घोषित करा’– आमदार टी. राजा सिंह यांचे प्रतिपादन१६ हजारांहून अधिक हिंदूंच्या उपस्थितीत अकोल्याचे ‘एकवीरा मैदान’ चैतन्यमय;संतांच्या वंदनीय उपस्थितीत पार पडली भव्य ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा..

vishwatmaklokswamivarta