vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

उद्योग विभागांतर्गत “मैत्री सेल”च्या माध्यमातून उद्योग सुरू करण्याबाबत मिळणार मोफत मार्गदर्शन

उद्योग विभागांतर्गत “मैत्री सेल”च्या माध्यमातून उद्योग सुरू करण्याबाबत मिळणार मोफत मार्गदर्शन

ठाणे, प्रतिनिधी ):- महाराष्ट्रामध्ये एखादा उद्योग कसा सुरु करावा, उद्योग सुरू करण्याकरिता लागणारे लायसन्स, परवाने, ना हरकत प्रमाणपत्र, इत्यादी बाबतची माहिती तसेच वेगवेगळ्या उद्योग स्थापनेमध्ये व चालविण्यामध्ये शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलती, अस्तित्वात असलेल्या उद्योगधंद्याबाबतच्या शासनाशी निगडित समस्या, महाराष्ट्रातून विविध उत्पादनाचे विदेशामध्ये एक्सपोर्ट कसे करावे, एक्सपोर्ट करण्याकरिता शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलती इत्यादीवर मार्गदर्शन करण्याकरिता उद्योग विभागांतर्गत “मैत्री सेल”च्या १८००-२३३-२०३३ या टोल फ्री क्रमांकाद्वारे मोफत माहिती देण्याची सुविधा सुरू आहे. या टोल फ्री क्रमाकांसोबतच कार्यालयीन ०२२-२२६२२३२२, २२६२२३६१ या दूरध्वनी क्रमांकावरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तरी अधिकाधिक उद्योजकांनी उद्योगाविषयी माहिती मिळविण्याकरिता उद्योग विभागाच्या या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी खातेदारांना आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी

vishwatmaklokswamivarta

लातूर येथे १० एप्रिल रोजी ‘मार्जिन मनी’ योजनेबाबत कार्यशाळेचे आयोजन

चिकू फळपिकविमा नोंदणीसाठीशेवटच्या पाच दिवसांची मुदत..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

थकीत कर्जाचा एक रकमी भरणा केल्यास व्याजात मिळणार 50 टक्के सवलत

vishwatmaklokswamivarta

गोदाम बांधकाम व मिनी ऑईल मिलसाठी २२ जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन