vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गणेश उत्सव मंडळांना वर्गणी जमा करावयाची असल्यास**सहाय्यक धार्मादाय आयुक्त यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक*

*गणेश उत्सव मंडळांना वर्गणी जमा करावयाची असल्यास**सहाय्यक धार्मादाय आयुक्त यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक*

 

            सातारा प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील सर्व गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी व देणगीदार यांनी धार्मिक व सार्वजनिक स्वरुपाच्या कार्यक्रमासाठी वर्गणी, देणगी जमा करावयाची असल्यास मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41 (क) नुसार सहाय्यक धार्मादाय आयुक्त, सातारा यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी शिवाय सार्वजनिक उपक्रमास निधी जमा करणे हा फौजदारीर स्वरुपाचा गुन्हा आहे. असे आढळल्यास वरील कायाद्याचे कलम 66 व 67 नुसार फौजदारी करवाई करण्याची तरतुद आहे, असे सहाय्यक आयुक्त धर्मादाय आयुक्त, सातारा यांनी कळविले आहे.

           सन 2025 सालातील तात्पुरत्या स्वरुपातील परवानगी देण्याचे काम दि. 26 ऑगस्ट 2025 अखेर चालू राहणार आहे. ऑनलाईन गणेशोत्सव परवानगीसाठी अर्ज व अर्ज भरण्याच्या माहिती पुस्तिकेची पीडीएफ ही www.charity.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर Application guidlines/प्रणाली मार्गदर्शन या टॅबखाली उपलब्ध आहे.

देणगी दारांनी देणगी देण्यापूर्वी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडील परवानगी प्रत पाहून खात्री करून देणगी, वर्गणी बाबत निर्णय घ्यावा. तसेच सर्व गणेश उत्सव मंडळाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी देणगी, वर्गणी स्वीकारण्यापूर्वी परवाना दाखविणेची व देणगी/वर्गणी मिळाले बाबतची आवश्यक ती पावती देण्याची खबरदारी घ्यावी, असेही सहाय्यक धर्मादाय आयुक्त सातारा विभाग सातारा यांनी कळविले आहे.

0000

संबंधित पोस्ट

बौद्ध विहार तथा बौद्ध स्मशानभूमी याची तात्काळ नोंद व्हावी या मागणी

vishwatmaklokswamivarta

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी !*

जालना जिल्ह्यात जनगणना २०२७ ची तयारी पूर्णत्वाकडे; १६ मेपासून घर सूचीकरण मोहिमेला सुरुवात

पीएमजेएवाय व एमजेपीजेएवाय योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या अंगीकृत खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

आदर्श आचारसंहिता नियमांचे काटेकोर पालन होण्याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटरहा महत्वपूर्ण उपक्रम—पालकमंत्री भरतशेठ गोगावले