vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वस्तुंच खरेदी करून त्यांना प्रोत्साहित करावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन- प्रदर्शनात 13 शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग, वस्तू विक्रीतून 31 हजार जमा…

दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वस्तुंच खरेदी करून त्यांना प्रोत्साहित करावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन- प्रदर्शनात 13 शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग, वस्तू विक्रीतून 31 हजार जमा…

 सांगली, प्रतिनिधी दिव्यांग मुलांच्या विशेष शाळांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंची खरेदी करून त्यांना प्रोत्साहीत करावे. यातून अशा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. तसेच, त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.

दिव्यांग मुलांच्या विशेष शाळांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी अजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी विजया यादव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी मेघना जोशी, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत निकम, मंजिरी माने आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिव्यांग मुलांचे सक्षमीकरणावर भर दिला आहे. त्यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा एक उपक्रम आहे. गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यात दिवसभर हे प्रदर्शन लावण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या प्रदर्शनात 13 शाळेतील जवळपास 50 हून अधिक विद्यार्थी शिक्षकांसह सहभागी झाले होते. या प्रदर्शनात दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या विविध सजावटीच्या, शोभेच्या वस्तू व रोबोटिक द्वारा बनविलेल्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंच्या विक्रीतून दिवसभरात जवळपास 31 हजार रूपये जमा झाले.

तहसीलदार अमोल कुंभार, उपशिक्षणाधिकारी, गणेश भांबुरे, सहायक महसूल अधिकारी विनायक यादव व रविंद्र हराळे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे सुनिल चौगुले, श्री. भिसे, महसूल सहायक विजय जाधव, जयंत खोत, शिपाई संदीप देसाई, पोपट सानप आदिंनी हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

00000

संबंधित पोस्ट

शाश्वत पाण्यासाठी जिल्ह्यात दि. 8 ते 22 मार्च 2026 दरम्यान साजरा होणार “जलमहोत्सव”

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील भरती प्रक्रिया पारदर्शक व ऑनलाईन होणार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

ठाणे आरटीओची कडक कारवाई’भारत स्टेज’च्या थकित वाहन कर वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध,पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

vishwatmaklokswamivarta

खरोळा सर्कलच्या विकासाचे शिल्पकार आदरणीय श्री. रमेशअप्पा कराड साहेबांचा सत्कार समारंभ…

vishwatmaklokswamivarta