vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी पंचशिल धम्म ध्वज यात्रा आज जालन्यात नागपूर ते चैत्यभुमी दरम्यान पू.भन्ते विनाचार्य साधणार जनसंवाद

महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी पंचशिल धम्म ध्वज यात्रा आज जालन्यात नागपूर ते चैत्यभुमी दरम्यान पू.भन्ते विनाचार्य साधणार जनसंवाद

राज्य प्रतिनिधी

महाबोधी महाविहार मुक्त झाला पाहिजे यासाठी नागपूर ते चैत्यभमी पर्यंत भंते विनायचार्य यांची पंचशील धम्म ध्वज यात्रा ही दि. 16 ऑगस्ट 2025 पासून सुरु झाली असून ती आज शनिवार दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी जालना शहरात दाखल होणार आहे. नागपूर दीक्षाभूमी ते चैत्यभूमी मुंबई अशी ही यात्रा आहे

बिहार मधील महाबोधी महाविहार मुक्ती च्या समर्थनार्थ जनसंवाद पंचशिल धम्म ध्वज यात्रा सुरु करण्यात आली आहे. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या नागभूमी नागपूर येथे दिक्षा घेतली व तमाम नवकोटी जनतेला दिक्षा दिली. त्याच पावन दिक्षाभूमीतून 17 ऑगस्ट 2025 पासून ही यात्रा सुरु झाली आहे. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तसेच बीटी अ‍ॅक्ट 1949 रद्द करणे ही मागणी घेऊन ही धम्म ध्वज, जनसंवाद यात्रा भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. ही यात्रा आज शनिवार दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी जालना शहरात येत असून सकाळी 11 वाजता मंठा चौफुली येथून भिख्खु संघ, उपासक, उपासिका यांची पदयात्रा निघणार आहे. ही पदयात्रा मंठा चौफुली ते अंबड चौफुली पर्यंत निघणार असून गायत्री लॉन्स, अंबड चौफुली येथे या पदयात्रेचा समारोप होईल. त्यानंतर दुपारी 2 वाजता गायत्री लॉन्स येथे प्रसिद्ध प्रबोधनकार विकास राजा आणि सुभाष कोठारे यांचा बुध्द भिम गीतांचा कार्यक्रम होणार आहे

या कार्यक्रमात सर्व उपासक आणि उपासीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन बुध्दविहार समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ला प्राधान्य देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’मुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे सर्व निकाल वेळेत जाहीर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

भंडारदरा शताब्दी महोत्सव पर्यटकांसाठी आकर्षण ठरावा – जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील विधान भवनातील बैठकीत कृती आराखड्याचा आढावा

नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

vishwatmaklokswamivarta

वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या शुल्कात सुधारणा दुचाकी वाहनांसाठी ६० रुपये, डिझेल वाहनांसाठी १८० रुपये शुल्क