vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

भारतीय बालरोग संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.तरूणा छाबडा तर सचिव डॉ. नामदेव वाघ

भारतीय बालरोग संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.तरूणा छाबडा तर सचिव डॉ. नामदेव वाघ

जालना/प्रतिनिधी

भारतीय बालरोग संघटनेच्या जालना जिल्हा अध्यक्षपदी डॉ. तरूणा धिरज छाबडा यांची तर सचिवपदी डॉ.नामदेव वाघ यांची निवड करण्यात आली.

जालना शहरातील एका हॉटेलमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात जिल्हा कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला . यावेळी मावळत्या अध्यक्षा डॉ. अनुराधा राख व सचिव डॉ. मधुर करवा यांनी नुतन अध्यक्ष डॉ. तरूणा छाबडा व डॉ. नामदेव वाघ यांना पद्भार सुपूर्द केला. तसेच संघटनेच्या उपाध्यक्षपदी डॉ. राजीव जेथलिया, सह सचिव डॉ. तुषार शिंदे, कोषाध्यक्ष डॉ. रवि बेदरकर यांची निवड करण्यात आली.

नुतन अध्यक्षा डॉ. तरूणा छाबडा यांनी बोलतांना सांगितले की, भारतीय बालरोग संघटनेची स्थापना सन 1963 मध्ये मुंबई येथे झाली. सदरील संघटनेचे संपुर्ण भारतात 50 हजार सभासद आहेत. संघटनेने आपल्यावर दिलेली जवाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडू असे त्या म्हणाल्या. नुतन अध्यक्षा डॉ. तरूणा छाबडा व सर्व कार्यकारिणीतील पदाधिकार्‍यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

——-

संबंधित पोस्ट

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त डॉक्टरांना दिल्या शुभेच्छा

जिल्ह्यात आजपासून स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानतालुकास्तरीय आरोग्य शिबिरांचा महिलांनी लाभ घ्यावा- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम

vishwatmaklokswamivarta

🏥📊 आरोग्य कार्यक्रम अंमलबजवनी निर्देशकामध्ये गडचिरोली जिल्हा राज्यात तिसऱ्या स्थानी

बुलढाणा शहरात २८ जून रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम;० ते ५ वर्षांच्या बालकांना डोस पाजण्याचे आवाहन

केंद्रीय मार्ड आंदोलनाविषयी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक

vishwatmaklokswamivarta

महिलांसाठी आता जिल्हास्तरावर ‘पीसीओडी क्लिनिक’ सुरूमहिलांच्या हार्मोनल व प्रजनन आरोग्य समस्यांवर विशेष उपचार सुविधा उपलब्ध