vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळठळक बातम्या

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींची अभिमानास्पद कामगिरी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून अभिनंदन

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींची अभिमानास्पद कामगिरी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून अभिनंदन..

मुंबई, प्रतिनिधी : कॅनडातील विनीपेग येथे झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या स्पर्धेत प्रितिका प्रदीप हिने दोन रौप्य पदके, गाथा आनंदराव खडके आणि शर्वरी सोमनाथ शेंडे यांनी कांस्य पदक पटकावत महाराष्ट्राचा गौरव वाढविला आहे. विशेष म्हणजे गाथा आणि शर्वरी यांनी अमेरिकेच्या संघावर अचूक निशाणा साधत एकतर्फी विजय मिळविला आहे. या यशाबद्दल क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

क्रीडा मंत्री ॲड. कोकाटे आपल्या संदेशात म्हणाले की, अचूक निशाणा साधून पदकावर कोरलेले भारताचे नाव हा देशवासीय व महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. हे यश अथक परिश्रम, मेहनत, संयम व जिद्दीचे मूर्तिमंत उदाहरण आहे. खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आपली ही ऐतिहासिक कामगिरी पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. या विजयामुळे महाराष्ट्रातील युवा खेळाडूंना नवे प्रेरणास्थान मिळाले असून राज्य शासन त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचेही मंत्री ॲड. कोकाटे यांनी नमूद केले आहे.

संबंधित पोस्ट

मुंबई महानगरपालिकेत आमदार संतोष बांगर यांचा ‘धडाका’; सायन-कोळीवाड्यात शिंदे सेनेचा प्रचार सुसाट!मुंबईतही आमदार बांगरांची ‘धडाकेबाज’ एन्ट्री; सायन-कोळीवाड्यात स्टार प्रचारक म्हणून झंझावाती प्रचार..

vishwatmaklokswamivarta

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी -मंत्री मंगलप्रभात लोढा§ जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार§ जनता दरबाराला उदंड प्रतिसाद, म्हाडा संक्रमण शिबिराचा प्रश्नही लवकरच सोडवणार.

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार

मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा – मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

हिंदु संत आणि महिला यांच्यावर अश्लाघ्य टीका करणारे प्रा. श्याम मानव यांचा ‘बुवा तेथे बाया’ हा कार्यक्रम रद्द करा !* – हिंदु राष्ट्र समन्वय समितीची मागणी 

शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरु करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

vishwatmaklokswamivarta