vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गणेशोत्सवासाठी रेल्वे स्थानकांवर तिकीट व सुविधा,चाकरमान्यांच्या प्रवासासाठी रेल्वे सज्ज. 380 गणपती विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था.

 गणेशोत्सवासाठी रेल्वे स्थानकांवर तिकीट व सुविधा,चाकरमान्यांच्या प्रवासासाठी रेल्वे सज्ज. 380 गणपती विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था

राज्य प्रतिनिधी-गणपती उत्सवाच्या काळात चाकरमान्यांच्या प्रवासासाठी रेल्वे सज्ज झाली असून एकूण तीनशे ऐंशी गणपती विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोकण मार्गावरील मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी विशेष सेवा उपलब्ध करून दिली आहे. मध्य रेल्वेने मडगाव, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, खेड, चिपळूण, पुणे, नागपूर आदी ठिकाणी सर्वाधिक म्हणजे तीनशे सहा विशेष फेऱ्या चालविल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या आरामदायी व सुरळीत प्रवासासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे आणि पनवेल या प्रमुख स्थानकांवर २२ ऑगस्ट २०२५ ते ३० ऑगस्ट २०२५ दरम्यान अधिकारी व वाणिज्यिक निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. गर्दी नियंत्रणासाठी एकशे ऐंशी तिकीट तपासणी कर्मचारी चोवीस तास तैनात केले आहेत. चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर दिवसरात्र अतिरिक्त तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची सोय करण्यात आली आहे

 तिकीट सुविधेसाठी तीस मोबाईल-यूटीएस यंत्रणा विविध स्थानकांवर वितरित करण्यात आल्या आहेत. मोबाईल-यूटीएस आणि यूटीएस ॲप प्रचार पथक २७ ऑगस्ट २०२५ पासून दहा दिवसांसाठी तैनात राहणार आहे. चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर प्रत्येकी दोन अतिरिक्त यूटीएस विंडो सुरू होतील. प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त सहाय्यक विविध स्थानकांवर नेमले जातील.

गणपती विशेष गाड्यांची माहिती स्थानकावरील चौकशी काउंटरवर तसेच अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. गणपती विशेष गाड्यांचे बॅनर्स आणि स्टँडीज प्रमुख स्थानकांवर लावण्यात आले आहेत. वृत्तपत्रे आणि सामाजिक माध्यमांतून पावती जाहिरात केली जात आहे. नियमित उद्घोषणा सुरळीत पार पडाव्यात यासाठी मुख्य वाणिज्यिक निरीक्षक मध्यवर्ती घोषणा कक्षात तैनात राहतील.

संबंधित पोस्ट

एचएमपीव्ही आजाराला घाबरून जावू नका, काळजी घ्यावी-सार्वजनिक आरोग्य मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे आवाहन

प्रशासकीय कामकाजात संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा जपण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आवाहन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

पणजी येथे 20 मार्चला डाक अदालत..

ठाणे जिल्ह्यातील खाडीपात्रातील वाळू उपसा थांबला-जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

कोकणचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा — उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार रोहा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जतच्या वैभवात भर पडेल- ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे- जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन उत्साहात