vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका चषक पर्यावरणपूरक व प्लास्टीकमुक्त सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धा 2025-26 चे आयोजन

नवी मुंबई महानगरपालिका चषक पर्यावरणपूरक व प्लास्टीकमुक्त सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धा 2025-26 चे आयोजन

 

      नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात पर्यावरण संरक्षण, आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता या विषयांवर अधिक भर देत विविध गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहित करण्याचा उद्देश नजरेसमोर ठेवून दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

 यावर्षी मुख्यमंत्री महोदयांनी श्रीगणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले असून त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने अधिक उत्साहाने महापालिका क्षेत्र स्तरावर ‘नवी मुंबई महानगरपालिका पर्यावरणपूरक व प्लास्टीकमुक्त सार्वजनिक गणेशदर्शन स्पर्धा 2025- 26’ चे आयोजन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

 या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या तसेच स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या व नवी मुंबई महानगरपालिकेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभागी होता येईल. सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना नमुंमपामार्फत नेमण्यात आलेले परीक्षक उत्सव स्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून व्हिडिओग्राफी व पूरक कागदपत्रे घेऊन त्यानुसार परीक्षण करुन स्पर्धेच्या मूल्यमापन निकषानुसार 10 सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची निवड करतील. या मंडळांना रोख रक्कमेसोबत स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

      रोख रक्कमेचे स्वरुप पुढीलप्रमाणे असेल – प्रथम पारितोषक रु. 75,000/- व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषक रु. 71,000/- व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, तृतीय पारितोषक रु. 61,000/- व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, चतुर्थ पारितोषिक रु. 51,000/- व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, पाचवे पारितोषिक रु. 41,000/- व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, सहावे पारितोषक रु. 31,000/- व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, सातवे पारितोषिक रु. 25,000/- व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, आठवे पारितोषिक रु. 21,000/- व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, नववे पारितोषिक रु. 11,000/- व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, दहावे पारितोषिक रु. 10,000/- व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र.

  तरी सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी गुगल फॉर्म भरणे गरजेचे असून त्याकरिता लिंक https://forms.gle/4Pr9hZtR7XiMguS1A वर विहीत नमुन्यातील अर्ज भरुन दि. 31/08/2025 पर्यंत सादर करावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावयाची आहे.

     नवी मुंबई महानगरपालिका आयोजित ‘नमुंमपा पर्यावरणपूरक व प्लास्टीकमुक्त सार्वजनिक गणेशदर्शन स्पर्धा 2025- 26’ मध्ये जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावे असे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत आवाहन करण्यात येत आहे.

000000

संबंधित पोस्ट

जेम्स अँड ज्वेलरी’ क्षेत्रातील कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रम सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्घाटन..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या महान वारशाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहूया.राष्ट्रीय सलोखा, सामर्थ्य आणि एकता याबद्दलची आपली बांधिलकी पुन्हा एकदा दृढ करण्यासाठी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा.

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जादा भाडे आकारणाऱ्या  खासगी कंत्राटी प्रवासी बस व रिक्षा यांचे विरुध्द तक्रार करा..

नमो पर्यटन सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी जागा निश्चित करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

ई-चलन संदर्भातील मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊ -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणार   

वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त वर्षभर चालणाऱ्या स्मरणोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 नोव्हेंबर 2025 रोजी करणार उद्घाटन

vishwatmaklokswamivarta