vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट वापरास बंदी

जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट वापरास बंदी

रायगड, प्रतिनिधी :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लेझर लाईटमुळे नागरिक तसेच बंदोबस्तासाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करता, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे.

दि. ०२ सप्टेंबर २०२५ (५ दिवसांचे विसर्जन) आणि दि. ०६ सप्टेंबर २०२५ (११ दिवस-अनंत चतुर्दशी) रोजी होणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लेझर लाईटचा वापर करण्यास कडक बंदी घालण्यात आली आहे.

अनेकदा मिरवणुकीतील ध्वनीक्षेपकांचा दणदणाट, डॉल्बी साऊंड सिस्टम, स्नो स्प्रे, हिट स्प्रे आणि लेझर बीम लाईट्समुळे नागरिकांना बहिरेपणा, हृदयविकाराचे झटके तसेच डोळ्यांचे आजार उद्भवले असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून ही कारवाई करण्यात आली आहे.

सदर आदेशाचा भंग करून विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट वापर करणाऱ्या व्यक्ती/संस्था/मंडळ/संचालक यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये दंडनीय कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिला आहे.

०००

संबंधित पोस्ट

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी (शिधापत्रिकाधारक) ई-केवायसी प्राथम्याने पूर्ण करावी

दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात हजार रुपयांची वाढ; 20 मार्चपूर्वी युडीआयडी आणि आधार अपडेट करण्याचे आवाहन

जिल्ह्यात ‘महाराजस्व समाधान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद,एकाच दिवसात हजारो महसुली प्रकरणांचा निपटारा

रोटी क्लब मुंबई डिस्टिक 31 41 आयोजित आनंदोत्सवामुळे ज्येष्ठांकडून जाहीर आभार

महसूल अधिकाऱ्यांची हस्तपुस्तिका’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचन योजना; 90 टक्केपर्यंत अनुदानाचा लाभ