vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईत सहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन

मुंबईत सहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन…

 

मुंबई प्रतिनिधी-

मुंबईत सहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यास प्रदूषण नियामक मंडळाने परवानगी दिली आहे. दीड दिवसांच्या गणेश विसर्जनादरम्यान कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करण्याचा बंधनकारक निर्णय झाल्यानंतर भक्त आणि मंडळांनी पालिकेच्या धोरणावर टीका केली होती. यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्याची मागणी केली होती आणि आता ती मागणी मान्य करण्यात आली आहे.

सहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या शाडू मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींचे विसर्जन बाणगंगा तलाव आणि गिरगाव चौपाटी येथे करण्यास परवानगी मिळाली आहे. या निर्णयाबद्दल समितीने प्रदूषण नियामक मंडळ आणि मुंबई महापालिकेचे आभार मानले आहेत.

राज्य सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनावर लादलेली बंदी समाप्त केली आहे. परंतु, सहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे, असे निर्देश देखील दिले गेले होते. यामुळे पालिकेने कृत्रिम तलावांची संख्या वाढवली आहे. मात्र, लहान मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक स्रोतात करू द्यावे, अशी मागणी सतत होत होती.

शाडू मातीच्या पुरवठ्यामुळे मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा मुंबई महापालिकेने सुमारे एक हजार टन शाडू माती मूर्तिकारांना पुरवली आहे, ज्यामुळे पर्यावरणपूरक मूर्तींच्या निर्मितीत मदत झाली आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नवी मुंबईत ‘भारत टॅक्सी’ सेवेचा प्रारंभ

आताची मोठी बातमी – ईडीची मोठी कारवाई! रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांवर फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 35 ठिकाणी छापे.

vishwatmaklokswamivarta

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी घेतले संत श्री गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन..

vishwatmaklokswamivarta

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तसेच भीमा व सीना नदीला सुरू असलेल्या विसर्गामुळे पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर,सोलापूरच्या मदतीसाठी ५ यांत्रिक बोटी रवाना….

vishwatmaklokswamivarta

पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी ‘महा इनविट’ संस्थेची स्थापना इनविट स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य..

व्हीबी-जी राम जी’ योजनेची पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी करा-रोहयो मंत्री भरत गोगावले· वि6भागनिहाय कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश