vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

आज शुक्रवार 5 सप्टेंबर 2025या शुभ दिनी “कुर्ला टू वेंगुर्ला” या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग…

आज शुक्रवार 5 सप्टेंबर 2025या शुभ दिनी “कुर्ला टू वेंगुर्ला” या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग…

 बॉलीवूड प्रतिनिधी-

कोकणच्या समस्या आणि कोकणातील निसर्ग पर्यटन जगासमोर मांडण्याकरिता सदर चित्रपटाच्या माध्यमातून एक सुंदर प्रयत्न करण्यात आलेला आहे

तो म्हणजे “कुर्ला टू वेंगुर्ला “या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात येत आहे हा एक अतिशय सुंदर चित्रपट अमरजीत आमले विजय कळमकर आणि टीमने बनवला आहे. या संपूर्ण चित्रपटाचे शूटिंग कोकणात वेंगुर्ला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहे,

संपूर्ण चित्रपटाची भाषा कोकणी आणि मालवणी आहे. कोकणातील सर्वात मोठी समस्या म्हणजे मुलांची लग्न आणि त्यामुळे होणारे स्थलांतर, रिकामे होणारे कोकण हा चित्रपटाचा मुख्य विषय आहे.

 या चित्रपटाच्या प्रसिद्धी आणि प्रमोशन साठी ग्लोबल कोकण आणि आपली संस्था या चित्रपटाला मदत करणार आहे. कोकणच्या समस्या आणि कोकणातील निसर्ग पर्यटन जगासमोर जाण्यासाठी चित्रपट हा प्रभावी माध्यम आहे, या चित्रपटाचे निर्माते अमरजीत आमले हे गेली 25 वर्ष कोकणातील तरुणांना सोबत घेऊन कोकणात सिनेमाची चळवळ राबवत आहेत. शेकडो मुलांना अॅक्टींग दिग्दर्शन एडिटिंग डायरेक्शन आर्ट डायरेक्शन अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देत आहेत. या विषयाची ही एक सामाजिक चळवळ आहे, कोकणात सिनेमा इंडस्ट्री विकसित व्हावी यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न आहेत. हा चित्रपट सर्व कोकणातील तरुणांनी एकत्र येऊन टीमवर्कच्या माध्यमातून निर्माण केला आहे, या चित्रपटाची निर्मिती ही एक लोकचळवळ आहे, हा चित्रपट जगासमोर नेण्यासाठी प्रमोशन आणि पब्लिसिटी मध्ये ग्लोबल कोकण आणि आपली चळवळ सहभागी होणार आहे. याच दृष्टीने या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आपल्या सर्व प्रमुख उद्योजकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी आयोजित केले आहे.

आपण या स्क्रीनिंग चे विशेष निमंत्रित आहेत आपण आवर्जून आणि वेळेत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणे विनंती. संपर्क : 97684 58073

दिनांकः शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५*स्थळः पु ल देशपांडे कला अकादमी (रवींद्र नाट्यमंदिर), मिनी थिएटर, तिसरा मजला, प्रभादेवी, मुंबई वेळ: सायंकाळी ७.३० वाजता

*संजय यादवराव* संस्थापक अध्यक्ष ग्लोबल कोकण / समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स / कोकण भूमी प्रतिष्ठान.

0000000

संबंधित पोस्ट

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने इन्स्टाग्रामवर दीपू चंद्र दास यांच्या हत्येबद्दल आणि बांगलादेशातील वाढत्या जातीय हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त 

vishwatmaklokswamivarta

भरतनाट्यम् गुरू अर्चना वासडीकरचे यश…

vishwatmaklokswamivarta

मला माझ्या प्रेक्षकांना—आणि स्वतःलाही आश्चर्यचकित करायला आवडते”: आमीर खान उपस्थितीत गाजली 56 व्या इफ्फीची शेवटची ‘फायरसाईड चॅट’

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा जाट च्या यशानंतर आता नव्या चित्रपट ‘ऑपरेशन खुकरी’ या चित्रपटात मोठी भूमिका करणार चित्रपटाचे हक्क घेतले विकत ….

नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२५उत्सवी वातावरणात संपन्न!अमेरिकन मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांचा मनमुराद आनंद घेतला! पुढील वर्षी नव्या उत्साहात, आणि अधिक देशांमध्ये ‘नाफा’ कार्यरत करण्याचा संकल्प”….

वेव्हज 2025- भारत सरकारच्या वतीने आयोजित पहिली जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद