vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यातील दीड लाख शिक्षकांचा पगार थांबण्याची शक्यता

राज्यातील दीड लाख शिक्षकांचा पगार थांबण्याची शक्यता..

राज्य प्रतिनिधी- राज्यातील सुमारे दीड लाख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यक कागदपत्रे अद्याप शासनाच्या ‘शालार्थ’ या प्रणालीमध्ये संग्रहित झालेली नाहीत. त्यामुळे शासनाने दिलेली अंतिम मुदत संपल्यानंतर अशा शिक्षकांचा पगार थांबविण्याचे आदेश वेतन अधीक्षकांनी दिले आहेत

दीड लाख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यक कागदपत्रे अद्याप शासनाच्या ‘शालार्थ’ या प्रणालीमध्ये संग्रहित झालेली नाहीत. त्यामुळे शासनाने दिलेली अंतिम मुदत संपल्यानंतर अशा शिक्षकांचा पगार थांबविण्याचे आदेश वेतन अधीक्षकांनी दिले आहेत.

नोव्हेंबर २०१२ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांनी आवश्यक कागदपत्रे ‘शालार्थ’ प्रणालीमध्ये अपलोड करणे बंधनकारक आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचा नियुक्ती आदेश, रुजू अहवाल, वैयक्तिक मान्यता पत्र, उपसंचालक कार्यालयातून जारी केलेले शालार्थ ओळखपत्र आदेश आदी आवश्यक कागदपत्र दिनांक १५ सप्टेंबरपर्यंत अपलोड करायची आहेत. पूर्वी ही मुदत दिनांक ३१ ऑगस्टपर्यंत होती. मात्र ती वाढवून आता १५ सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे. दरम्यान या मुदतीनंतर कोणत्याही शाळेने दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत, तर संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुढील महिन्यापासून पगार रोखण्यात येईल. याबाबत सर्व शाळांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित पोस्ट

राज्यात इंधनसाठा मुबलक; पेट्रोल, डिझेल व एलपीजी पुरवठा सुरळीत-अफवांपासून दूर राहण्याचे अन्न नागरी पुरवठा विभागाचे आवाहन इंधन वितरण यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत

शासकीय कार्यालयांमधील गट क व गट ड पदांच्या नियुक्तीसाठी 23 जुलै रोजी पूर्वतयारी बैठक-उपजिल्हाधिकारी नागेश पाटील

पोलीस पाटील भरती परीक्षेच्या उपकेंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी – ईडीची मोठी कारवाई! रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांवर फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 35 ठिकाणी छापे.

vishwatmaklokswamivarta

ग्रामविकासासाठी लोकसहभाग व शाश्वत नियोजन आवश्यक– जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- विकसित भारत – जी-राम-जी मिशनचा जिल्हास्तरीय शुभारंभ विविध विकासकामांचाही शुभारंभ

विदर्भातील पूरस्थितीचा आढावा-मदत आणि पुनर्वसन कार्य तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश- मंत्री गिरीश महाजन