vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीस्थानिक बातम्या

नवी मुंबई महापालिका शालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला उत्साही प्रतिसाद

नवी मुंबई महापालिका शालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला उत्साही प्रतिसाद

              राज्य प्रतिनिधी  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे यांच्या सहकार्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन येथे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 8 व 9 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा 2025-26’ उत्साहात संपन्न झाल्या.

            या स्पर्धेचा अनौपचारिक शुभारंभ ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव डॉ.हेमंत अनार्थे यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा सदस्य श्री. धनंजय वनमाळी, ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनचे सदस्य श्री.साटम आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत 14, 17 व 19 वर्षाआतील मुले व मुली सहभागी झाले होते. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून मुलांच्या गटात 465 खेळाडू आणि मुलींच्या गटात 344 खेळाडू असे एकुण 819 खेळाडू सहभागी झालेले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी स्पर्धेत मोठ्या संख्येने खेळाडूंचा वाढलेला उत्साही सहभाग दिसून आला..

       या स्पर्धेतील मुलांच्या 14 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक- वेदांत मांढरे, आई. इ.एस. नवी मुंबई हायस्कूल वाशी, व्दितीय क्रमांक – शिवराम कस्तुरी ए.पी.जे.स्कूल, नेरुळ, तृतीय क्रमांक- तन्मय पवार- डॉ.डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कुल नेरुळ, चौथा क्रमांक- मितेश माने, सेंट झेवियर्स हायस्कुल नेरुळ, पाचवा क्रमांक – वेद सुर्वे, सेंट झेवियर्स हायस्कुल नेरुळ यांनी पटकाविला.

   मुलांच्या 17 वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक – कौस्तव जैयस्वाल, पोद्दार इंटरनॅशनल स्कुल (सीबीएसई) नेरुळ, व्दितीय क्रमांक – रोहन तायडे, आय.सी.एल,कॉलेज वाशी, तृतीय क्रमांक- हेम नंदा, क्राईस्ट अकॅडमी स्कुल कोपरखैरणे, चतुर्थ क्रमांक – संचित गावरे, सेंट झेवियर्स हायस्कुल ऐरोली, पाचवा क्रमांक – विघ्नेश कदम, हायस्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज सानपाडा यांनी संपादन केला.

     मुलांच्या 19 वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक – सुयश पाटील, सेंट झेवियर्स हायस्कूल नेरुळ, व्दितीय क्रमांक – कपिल शेषवारे, सेंट झेवियर्स हायस्कूल नेरुळ, तृतीय क्रमांक-ऋषीकेश गव्हाणे, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी, चतुर्थ क्रमांक – इमाद अहमद, ए.पी.जे.स्कुल नेरुळ, पाचवा क्रमांक – रमेश मुळीक, न्यु होरायझन स्कॉलर स्कुल ऐरोली यांनी पटकाविला.

  स्पर्धेतील मुलींच्या 14 वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक – सारा शेख, आई.इ.एस.नवी मुंबई हायस्कूल वाशी, व्दितीय क्रमांक -वीरा गोतारणे, न्यु होरायझन स्कॉलर स्कुल ऐरोली, तृतीय क्रमांक- सीया शेळके, डॉ.डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कुल नेरुळ, चौथा क्रमांक- अनन्या खटावकर, वाशी इंग्लिश हायस्कूल ॲड टिळक ज्युनिअर कॉलेज वाशी, पाचवा क्रमांक – हुडा खान, सेंट लॉरेन्स हायस्कूल वाशी यांनी यश मिळविले असून हे सर्व खेळाडू पुढील मुंबई विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत.

  ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन येथील सुसज्ज अशा सभागृहात स्पर्धा आयोजनासाठी सर्व विश्वस्त आणि व मॅनेजिंग कमिटीचे महानगरपालिकेस महत्वाचे सहकार्य लाभले. स्पर्धेतील वाढता सहभाग हा नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे फलित असल्याचे दिसून येत असून या नवी मुंबई मनपा जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्या खेळाडूंना पुढील मुंबई विभागीय स्पर्धेसाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.

00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबईत करावेच्या ज्ञानदीप शाळेत चिमुकल्या बाल हातांनी घडविल्या पर्यावरणपूरक सुबक गणेशमूर्ती

शहापूर येथील पद्मश्री सिंधुताई सपकाळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वामी विवेकानंद जयंती दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’म्हणून साजरा

vishwatmaklokswamivarta

मेट्रो २ बी मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण अखेर निश्चित,डायमंड गार्डन – चेंबूर ते मंडाळे या पाच पूर्णांक सहा किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन येत्या चार डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

vishwatmaklokswamivarta

नागपूर बोर्डात समस्या निवारण सभाआमदार सुधाकर अडबाले यांच्‍या पुढाकाराने विविध विषयांवर चर्चा..

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीना 8 मे पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

अद्यापही ऊसदर जाहीर न केलेल्या कारखान्यांनी त्वरित दर जाहीर करावा**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta