vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ओबीसीचा समाजावरील अन्याय विरोधात खेड तहसिल कार्यालयावर 15 सप्टेंबर रोजी धडक मोर्चा मराठा- कुणबी एक नाहीत, शासन निर्णय रद्द करा !

ओबीसीचा समाजावरील अन्याय विरोधात खेड तहसिल कार्यालयावर 15 सप्टेंबर रोजी धडक मोर्चा मराठा- कुणबी एक नाहीत, शासन निर्णय रद्द करा !

खेड प्रतिनिधी- मराठ्यांना कुणबी दर्जा देण्याच्या हैदराबाद गॅझेटीयरच्या अंमलबजावणीशी संबंधित दि.2 सप्टेंबर 2025 शासन निर्णय काढला आहे. मराठा, कुणबी एक नाहीत. राजकीयदृष्ट्या प्रबळ आणि प्रगत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून दाखले देण्याचा सरकारचा निर्णय मनमानीकारक असून, संविधानाचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तहसिल कार्यालयावर ओबीसी समाजाचा 15 सप्टेंबर रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.अशी माहिती कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई खेड अध्यक्ष कृष्णा आग्रे गुरुजी यांनी दिली.

हा मोर्चा सोमवार दि.15 सप्टेंबर 2025 रोजी भरणे येथील काळकाई मंदिरापासून -भरणे नाका-छत्रपती शिवाजी चौक-बाजारपेठ-गणपती मंदिर-तीन बत्ती नाका- खेड तहसीलदार कार्यालयापर्यंत पायी चालत जाऊन खेड तहसिलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.

कुणबी नावाने,ओबीसी मध्ये मराठ्यांची घुसखोरी ताबडतोब थांबवा. महाराष्ट्र सरकारने, हैद्राबाद गॅझेटीयरला मान्यता देणाऱ्या, शासन निर्णयान्वये मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना व त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात; सातारा, कोल्हापूर इत्यादी गॅझेटीयरना मान्यता देऊन, महाराष्ट्रातील सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी दाखले देऊन, ओबीसी आरक्षणामध्ये घुसविण्याचा घाट घातलेला आहे. त्यामुळे आपले ओबीसी आरक्षण संपूर्णतः धोक्यात आलेले आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाचा धसका घेत राज्य सरकारने मराठ्यांना हैदराबाद गॅझेटमधील नोंदीच्या आधारे ओबीसी प्रवर्गातून दाखले देण्याचे काम तात्काळ थांबवावे.

आपले हक्क व अधिकार आबाधित राहण्यासाठी या मोर्चासाठी खेड तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवानी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई खेडचे अध्यक्ष कृष्णा आग्रे गुरुजी, खेड ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समिती खेडचे अध्यक्ष दिपक शिगवण, कुणबी समाजोन्नती संघ,युवा कार्यकारणी अध्यक्ष सुरज जोगळे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

तिबेटमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात 95 जणांचा मृत्यू झाला आहे. शेजारच्या नेपाळ, भूतान आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गावागावात शाखा स्थापन करणार – सचिन आडे पाटील

आमदार-खासदार,संस्था चालकांचे बेकायदेशिर अतिक्रमण निष्काशित करुन दलित आदिवासी भूमिहिन कास्तपट्टे नावे करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरु करावी- अ‍ॅड. मगरे

बहार-ए-उर्दू’ चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन राज्य उर्दू साहित्य अकादमीचा सुवर्ण महोत्सवानिमित्त ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान कार्यक्रम

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘जागतिक तंबाखू विरोधीदिनानिमित्त जनजागृती प्रश्नमंजूषा 2025‘मायगॉव्ह’ (MyGov) मंचावर मराठीसह 11 भाषांमध्ये उपलब्‍ध..

vishwatmaklokswamivarta

जालना येथील घाणेवाडी येथे गुरूवारी संदल शरीफ