vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

26 सप्टेंबरला हयात प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयात शिबिराचे आयोजन 

26 सप्टेंबरला हयात प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयात शिबिराचे आयोजन

जालना, प्रतिनिधी- केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत विशेष सहाय योजनेतील लाभार्थ्यांच्या हयात दाखल्याबाबत बेनिफिशरी सत्यापन ॲप विकसीत केले आहे. जालना तहसिल कार्यालयात शुक्रवार दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी तहसिल कार्यालय जालना येथे सुचना फलकावर डकविण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी शिबीरात उपस्थित राहून हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन जनरेट करुन घ्यावे, असे आवाहन तहसीलदार छाया पवार यांनी केले आहे.

बेनिफिशरी सत्यापन ॲपव्दारे केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत लाभ घेणा-या लाभार्थ्यांचे डिजीटल लाईफ सर्टीफिकेट म्हणजे हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करावयाचे असून सादर केलेले प्रमाणपत्र एनएसएपी पोर्टलवर अपडेट होत आहेत. तरी जालना जिल्ह्यातील इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या योजनेअंतर्गत लाभ घेणारे लाभार्थी यांनी संजय गांधी शहर व ग्रामीण तहसील कार्यालय जालना, महाईसेवा केंद्र, सीएससी केंद्र, ग्रामपंचायत केंद्र, येथे डिजीटल हयात प्रमाणपत्र म्हणजे हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करावेत.

विशेष सहाय कार्यक्रमांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्तीवेतनयोजनेअंतर्गत डीबीटीव्दारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असून ज्या लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत बँक खात्याशी आपले दूरध्वनी क्रमांक संलग्न केलेले नसल्यास संबंधित बँक, पोस्ट कार्यालय येथे आपला दूरध्वनी क्रमांक लिंक करुन घेण्यात यावा. जेणेकरुन एसएमएसव्दारे अनुदान जमा झाल्याची माहिती होईल. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

भिवंडीत ‘मिथेनॉल’चा मोठा साठा जप्त; आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार एफडीएची धडक कारवाई

चेंबूर पेट्रोल पंप कुर्ला स्टेशन मार्गावरून नेहरूनगर डेपो अशी सेवा सुरू करण्याची मागणी-धारावीकरांना चेंबूर मध्ये जाण्यासाठी बस सेवेची अडचण-

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. श्री. सदानंद दाते यांचा काल गडचिरोली दौरा पार पडला..

vishwatmaklokswamivarta

नागरिकांनी सजग आणि सतर्क राहून देश सुरक्षेचे कान आणि डोळे व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शौर्य, शांतता आणि जागरूकतेचा संदेश देत ‘ग्लोबल पीस ऑनर’ कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

vishwatmaklokswamivarta

सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा गौरव – मंत्री आदिती तटकरे यांची माहिती