vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

जागतिक कौशल्य स्पर्धा 2026-उमेदवारांच्या निवडीसाठी स्किल कॉम्पीटीशनØ तरुणांना कौशल्य स्पर्धेकरिता संधी ; 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणीचे आवाहन

जागतिक कौशल्य स्पर्धा 2026-उमेदवारांच्या निवडीसाठी स्किल कॉम्पीटीशनØ तरुणांना कौशल्य स्पर्धेकरिता संधी ; 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणीचे आवाहन

बुलडाणा, प्रतिनिधी- जगातील सर्वांत मोठी व्यवसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा दर दोन वर्षांनी घेण्यात येत असून ही जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2026 मध्ये शांघाई, चीन येथे आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत 23 वर्षाखालील तरुणांना आपली कौशल्ये सादर करण्याची संधी असून तरुणांनी 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करुन या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल कॉन्सील तसेच विविध औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्याने 63 विविध क्षेत्रांमध्ये जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर स्किल कॉम्पीटीशनचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमधून निवड झालेल्या उमेदवारांची नावे देशपातळीवरून जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत.

या स्पर्धेत सहभागासाठी वयोमर्यादा हा एकमेव निकष असून 50 क्षेत्रांसाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2004 किंवा नंतरचा असणे आवश्यक आहे. तर 13 विशेष क्षेत्रांसाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2001 किंवा नंतरचा असणे गरजेचे आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त गणेश बिटोडे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करावेत

19 वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अभिज्ञान कुंडू याचा महासभेत सन्मान

मेरा युवा भारततर्फे तालुकास्तरीय खेळ स्पर्धा

कोल्हापुरचा अजिंक्य रेडकर नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा विजेता-नेरूळच्या निरंत पाटील याने पटकाविला नमुंमपा क्षेत्र श्री सन्मान

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा थाटात शुभारंभ-अत्याधुनिक क्रीडा सुविधांच्या माध्यमातून बुलढाण्याचा नावलौकिक वाढविणार – आमदार संजय गायकवाड

vishwatmaklokswamivarta

जिल्हा क्रीडा संकुलात अद्ययावत सुविधांसाठी आराखडा तयार करा- पालकमंत्री जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत दिल्या सूचना…