vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

युवकांनी विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग क्विझमध्ये सहभागी व्हावे-जिल्हा युवा अधिकारी प्रणीत सांगवीकर यांचे आवाहनØ सर्वोत्तम स्पर्धेकांचा गौरव होणार

युवकांनी विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग क्विझमध्ये सहभागी व्हावे-जिल्हा युवा अधिकारी प्रणीत सांगवीकर यांचे आवाहनØ सर्वोत्तम स्पर्धेकांचा गौरव होणार

बुलढाणा, प्रतिनिधी: ‘मेरा युवा भारत’, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालयाच्यावतीने देशभरातील युवकांना विशेष उपक्रमात सहभागी करुन घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग क्विझ आयोजित करण्यात आला असून या क्विझमध्ये जिल्ह्यातील युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या क्विझमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक युवक-युवतीला माय भारत पोर्टल तर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार असून सर्वोत्तम गुण मिळविणाऱ्या स्पर्धेकांचा विशेष गौरव केला जाणार आहे. युवकांनी ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी, स्वत:ला सिध्द करण्यासाठी तसेच प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या क्विझमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. क्विझमध्ये सहभागी होण्यासाठी युवकांनी https://mybharat.gov.in वर नोंदणी करुन क्विझ सोडवावा.

“बुलढाणा जिल्हा हा राज्यात सर्वाधिक सहभाग नोंदविणारा ठरावा या हेतूने जिल्ह्यातील युवक मंडळे, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था तसेच युवकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे,” असे आवाहन बुलढाण्याचे जिल्हा युवा अधिकारी प्रणीत सांगवीकर यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मौलाना अबुल कलाम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडल्या ॲथलेटिक्स स्पर्धा

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा थाटात शुभारंभ-अत्याधुनिक क्रीडा सुविधांच्या माध्यमातून बुलढाण्याचा नावलौकिक वाढविणार – आमदार संजय गायकवाड

vishwatmaklokswamivarta

“मिशन लक्ष्यवेध” जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अंतर्गत खेळाडू निवड चाचणी आयोजित

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जलसंपदा विभागाच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्धाटन

मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडूंनी निवड चाचणीसाठी 9 एप्रिलपर्यंत अर्ज करावेत- जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर- रोइंग, लॉन टेनिस, मैदानी, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड होणार

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा येथे उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबीर!