vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

शारदीय नवरात्रौत्सवात जागर महिला आरोग्याचा विशेष अभियान

शारदीय नवरात्रौत्सवात जागर महिला आरोग्याचा विशेष अभियान

आरोग्य प्रतिनिधी-

अमरावती, : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती आणि शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ‘शारदीय नवरात्रौत्सव – जागर महिला आरोग्याचा’ हे विशेष अभियान राबवले जाणार आहे. अभियान 23 ते 30 सप्टेंबर दरम्यान चालणार आहे.

अभियानात महिलांच्या आरोग्याशी संबंधित तपासण्या, मार्गदर्शन आणि सल्ला दिला जाणार आहे. तसेच, शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ताणतणाव आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांवर तज्‍ज्ञांकडून व्याख्यान आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. यात दि. 23 सप्टेंबर रोजी महिला कर्करोग तज्‍ज्ञ डॉ. भावना सोनटक्के, महिलांचे कर्करोग आणि ब्रेस्ट कॅन्सरवर मार्गदर्शन करतील. या दिवशी महिलांसाठी आरोग्य तपासणी, पॅप्समिअर आणि मॅमोग्राफीची मोफत तपासणी उपलब्ध असेल.

   दि. 24 सप्टेंबर रोजी कायदे तज्‍ज्ञ वर्षा देशमुख महिला आणि कायद्याविषयी मार्गदर्शन करतील. तसेच अनिरुद्ध पाटील महिला सबलीकरणावर मार्गदर्शन करतील.

   दि. 25 सप्टेंबर रोजी मेंदू रोग तज्ज्ञ डॉ. अडवाणी मेंदू रोगाविषयी, तर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. पवन अग्रवाल जीवनशैली आणि हृदयरोगाविषयी मार्गदर्शन करतील.

 दि. 26 सप्टेंबर रोजी स्त्री रोग तज्‍ज्ञ डॉ. नेहा देशमुख महिलांसाठी स्त्री रोगांबाबत मार्गदर्शन करतील. तर बाल किडनी तज्‍ज्ञ डॉ. नयन चौधरी किडनीविषयक मार्गदर्शन करतील. प्रिती ठाकरे ह्यूमन मिल्क बँकेविषयी माहिती देतील. दि. 29 सप्टेंबर रोजी मानसोपचार तज्‍ज्ञ डॉ. अक्षय चांदूरकर ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ तर वन अभ्यासक यादव तरटे ‘वनातील वनश्री’ आणि ‘वनातील स्त्रीशक्ती’ यावर माहिती देतील.

  दि. 30 सप्टेंबर रोजी त्वचारोग तज्‍ज्ञ डॉ. ज्योत्स्ना देशमुख ‘स्किन केअर’ आणि ‘स्किन इन्फेक्शन्स’ विषयी जागरूकता निर्माण करतील. आहारतज्‍ज्ञ डॉ. प्रणिता कडू ह्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी विविध उपचार पद्धतींवर मार्गदर्शन करतील.

    हे अभियान महिलांसह शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीयदेखील यात सहभागी होऊ शकतील. दि. 23 ते 26 सप्टेंबर फक्त महिला कर्मचाऱ्यांसाठी राखीव राहणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

नमो नेत्र संजीवनी अभियानाव्दारे हजारो रूग्णांच्या आयुष्यात प्रकाश- या अभियानात 29 सप्टेंबरअखेर 9 हजार 385 रूग्णांची तपासणी, 1 हजार 5 शस्त्रक्रिया..

हिंद-की-चादर’ शताब्दी समागमासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज*लाखो भाविकांसाठी 15 दिवस व्यापक आणि मोफत वैद्यकीय सेवा..

30 खाटाच्या रुग्णालयांना आवाहन

अद्ययावत मॉडयूलर ओ.टी. कामासाठीसिव्हील हॉस्पीटल सांगलीत नियमित शस्त्रक्रिया बंद राहणार- तातडीच्या शस्रक्रिया सुरू राहणार- नियमित शस्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे होणार

कुटुंबाच्या आरोग्यावरील खर्चाचे सर्वेक्षण होणार, सांख्यिकी कर्मचारी देणार निवडक कुटुंबाना भेटी • नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शहापूर तालुक्यातील आदिवासी बहुल फुगाळे गावात ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्थेकडून आदिवासी बांधवाना मोफत रोग निदान व उपचार शिबीर संपन्न…

vishwatmaklokswamivarta