vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना त्रैमासिक विवरणपत्र तात्काळ सादर करण्याचे आवाहन

सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना त्रैमासिक विवरणपत्र तात्काळ सादर करण्याचे आवाहन

            सांगली, प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी 30 सप्टेंबर 2025 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र (ई.आर-1) तात्काळ सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त इ. सि. शेख यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.    सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करण्यास भाग पाहणे) अधिनियम 1959 नुसार रिक्तपदे कळविणेबाबत व तिमाही विवरणपत्र ईआर-1 मध्ये मनुष्यबळाची माहिती सादर करणे बंधनकारक आहे.

      सांगली जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्रातील उद्योजकांनी त्यांच्याकडे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती बाबतचे दिनांक 30 सप्टेंबर 2025 अखेरच्या तिमाहीचे विवरणपत्र ईआर-1 https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवरुन ऑनलाईन सादर करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली दूरध्वनी क्रमांक 0233-2990383 वर संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

000000

संबंधित पोस्ट

मुंबईतील वांद्रे ते कुर्ला #पॉडटॅक्सी चा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

अद्यापही ऊसदर जाहीर न केलेल्या कारखान्यांनी त्वरित दर जाहीर करावा**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

दावा न केलेली रक्कम खातेदारांना देण्यासाठी बँकांनी जनजागृती करावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दावा न केलेली रक्कम खातेदारांना परत देण्यासाठी महामेळावा संपन्न- ⁠आतापर्यंत ३३४ खातेदारांना ३९ लाखांचा लाभ..

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख -भारताला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवणारा ऐतिहासिक WAVES 2025 महोत्सव भारताची सांस्कृतिक शक्ती आणि तंत्रज्ञानाची जादू एकाच व्यासपीठावरWAVES 2025 मध्ये सामील व्हा आणि जागतिक क्रिएटिव्ह क्रांतीचे साक्षीदार व्हा…

निराधार, श्रावणबाळचे पैसे तात्काळ वितरीत करावेत-उपमुख्यमंत्री अजित पवार

गडचिरोलीत आरोग्य क्रांती : जागतिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*अहेरी येथे महिला-बाल रुग्णालयाचे लोकार्पण, सिरोंचात रुबी रुग्णालयाचे भूमिपूजन**औद्योगिक विकासासोबत गडचिरोलीची आरोग्य सेवेतील ऐतिहासिक झेप

vishwatmaklokswamivarta